भारतीय क्रिकेटपटूंना सरावात साथ देतोय गोंदियाचा गौरव

0
26

गोंदिया : भारतीय क्रिकेट संघासाठी व संघातील दिग्गजांसोबत खेळण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. ही संधी स्थानिक स्थानिक मिस्टीस क्रिकेट अकादमीचा खेळाडू गौरव फरदे याला प्राप्त झाली. सध्या तो नागपुरात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंना सरावाला साथ देत आहे.
आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाने 2 फेब्रुवारीपासून नागपुरात सराव सुरू केला आहे. पहिली कसोटी नागपुरातील जामठा स्टेडियमवर 9 ते 13 तारखेपर्यंत खेळवली जाणार आहे. एक महत्त्वाची मालिका जी भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नेईल. पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडिया नागपूर येथील सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जुन्या स्टेडियममध्ये सराव करत आहे. या सरावात गौरव फरदे हा नेट गोलंदाज म्हणून विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव यांना गोलंदाजी करुन त्यांना सरावात साथ देत आहे. तसेच आर. अश्विन, रवींद्र जडेजा यांसारख्या स्टार खेळाडूंकडून गोलंदाजीचे धडे ही घेत आहे. 18 वर्षांच्या गोंदियाच्या या खेळाडूला एवढ्या मोठ्या खेळाडूंसमोर आपली प्रतिभा दाखवण्याची मिळालेली संधी ही त्याच्या उज्जवल भविष्याला दिशा देणारी ठरणारी असल्याची अशी माहिती मिस्टीक्स क्रिकेट अकादमीचे उपेंद्र थापा यांनी दिली.