नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी लांजेवार तर सचिवपदी खळसिंगे

0
17

देवरी- महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत देवरी तालुका नाभिक समाज संघटनेची नियोजीत मासिक बैठक ४ फेब्रुवारी शनिवारला सरस्वती शिशु मंदिरात जिल्हा उपाध्यक्ष चेतन मेर्शाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या मासिक बैठकीत सवार्नुमते तरुण उत्साही असलेले ससेराज लांजेवार यांची मुख्य कार्यकारीणीच्या तालुकाध्यक्षपदी तर, त्यांच्याच जोडीला सचिवपदी म्हणून विनोद खळसिंगे गुरुजी आणि युवा संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी देवेंद्र लांजेवार या तीन पदाधिकार्‍यांची मासिक बैठकीला उपस्थित असलेले सवार्नुमते निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक ग्यानीराम बारसागडे, राजाराम बारसागडे, शालीकराम बारसागडे, जिल्हा सचिव सुरेश चन्ने, जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने, तालुका उपाध्यक्ष प्रमोद बारसागडे, सहसचिव जगदीश खळसिंगे, कोषाध्यक्ष आनंद शिवणकर, सलून संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाळूभाऊ मेर्शाम, सचिव महेंद्रजी उरकुडे, संघटक विजय बारसागडे, महेश चन्ने, युवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बंट्टी श्रीवास, सचिव सागर मौदेकर, सहसचिव काजू मेर्शाम, सदस्य रवि मौदेकर, कमलेश हटवार आदी मान्यवर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकारी आणि उपस्थित पदाधिकारी या सर्वांनी समाजाला नाभिक समाजाच्या एकतेसाठी उत्तम समाजकारण करण्यासाठी कटीबद्ध राहण्यासाठी मार्गदर्शन केले