साखरीटोला येथे सिमेंट रस्ता व संरक्षण भिंत बांधकामाचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भुमिपूजन.

0
14

साखरीटोला,ता.०७:- आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातीलं साखरीटोला/सातगाव येथे अल्पसंख्यांक निधीतून मंजूर झालेले २५ लाख रूपयाचे सिमेंट कॉंक्रिट रस्ता व संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन शनिवार (ता. ४ फेब्रुवारी) रोजी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प.सदस्य वंदना काळे ह्या होते. या प्रसंगी जि.प.सदस्य उषा मेंढे, सालेकसा पं. स. चे उपसभापती संतोष बोहरे, सातगावचे सरपंच नरेश कावरे, काँग्रेसचे वरीष्ठ कार्यकर्ता भुमेश्वर मेंढे, राजू काळे, संजय देशमुख, मुस्तफा कुरैशी यांच्या सह साखरीटोला/सातगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते