एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा

0
12

गोंदिया,दि.14 : जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे जिल्हास्तरीय एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 व 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत करण्यात आले. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा फुटबॉल संघटना सचिव खुर्शिद अन्सारी, निरज तिवारी व रवि नैताम उपस्थित होते.

           जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राठोड यांनी खेळाडूंना सदर स्पर्धेची विस्तृत माहिती देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. स्पर्धेबाबतच्या नियमांची माहिती रवि नैताम यांनी दिली.

            सदर स्पर्धेत 14 वर्षे आतील मुलांच्या 8 संघानी सहभाग घेतला. त्यात 128 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत नुतन विद्यालय गोंदिया या संघाने विजय संपादन केला. सर्व संघातील उत्कृष्ट खेळाडूंची पुढील निवड चाचणीकरीता निवड करण्यात आली असून त्यात अमान शेख, स्वरीत श्रीवास्तव, प्रणव नागदेवे, निहाल ठाकुर, यमन चाफले या खेळाडूंना वर्धा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत निवड चाचणीसाठी सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे. विजयी संघ वर्धा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी विजयी संघाला शुभेच्छा दिल्या.

           कार्यक्रमाचे संचालन एन.एस.उईके यांनी केले, तर उपस्थित खेळाडू व पालकांचे आभार विनेश फुंडे यांनी मानले.