माझी कन्या भाग्यश्री योजनेतंर्गत 84 मुलींना मुदत ठेव प्रमाणपत्र वितरीत

0
23

गोंदिया,दि.14:- जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातंर्गत येत असलेल्या येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गोंदिया 01 च्या वतीने स्थानिय पंचायत समितीच्या सभागृहात माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत पात्र 84 मुलींच्या पाल्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण(दि.13)करण्यात आले.कार्यक्रमाला गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल,गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश राहांगडाले,महिला व बालकल्याण विभाग जि.प.सभापती सविताताई पुराम,अर्थ व बांधकाम विभाग सभापती योपेन्द्रसिंग (संजय) टेंभरे, समाजकल्याण सभापती पुजाताई सेठ,गोंदिया पंसचे उपसभापती निरज उपवंशी,गटविकास अधिकारी डाँ.वेदप्रकाश चौरागडे,सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर मुडे,पं.स.सदस्य शिवलाल जामरे,देवरी नगर पंचायतच्या नगरसेविका पिंकीताई कटकवार,बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश पी. सोनटक्के,विशाल भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत बँक आँफ महाराष्ट्रचे मुदत ठेव प्रमाणपत्र यांमध्ये रू. 50 हजार च्या मुदत ठेवकरीता 3 पात्र मुली व रू. 25 हजारच्या एफडीकरीता 81 पात्र मुलींचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी(सांख्यिकी)तिर्थराज ते. उके यांनी केले.प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी नरेश पी.सोनटक्के यांनी केले.आभार अंगणवाडी बीट पर्यवेक्षिका कु. जी.डी.पंधरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अंगणवाडी बीट पर्यवेक्षिका सौ.सुनिता ए. दमाहे, सौ. शशिकला ए. तावाडे, सौ. दया बी. राऊत, सौ. गुलाब डी. पारधी, सौ. रमा वाय. बोरकर, सौ. ऊषा वाय. आगासे, कनिष्ठ सहाय्यक श्रीमती व्ही.एस.बारस्कर, परिचर श्रीमती के.आर. नागपुरे यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ. कल्पना पटले, सौ.सुनिता पटले, सौ. ललिता बघेले, सौ.पुस्तकला बघेले, सौ. रेखा राहांगडाले, सौ. बबिता रामटेके, श्रीमती ऊषा लांजेवार, सौ. संगीता हेमने, सौ. पुष्पा दोनोडे, सौ. जनुका चौव्हान, सौ.लता बिसेन आदिंनी मोलाचे सहकार्य केले.