खासदार मॅरेथॉन स्पर्धेला गोंदियात प्रतिसाद

0
13

गोंदिया:खासदार क्रीडा महोत्सवाच्या महाकुंभात आज गोंदिया येथे हजारो महिला आणि पुरुष मॅरेथॉन स्पर्धेत धावले. स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. खासदार सुनील मेंढे यांनी हिरवी झेंडी दाखवीत स्पर्धेला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खा.सुनील मेंढे यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. 9 मार्च पासून भंडारा व गोंदिया लोकसभा क्षेत्रात खेळाच्या महाकुंभाला सुरुवात झाली. दोन्ही जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत.आज 12 मार्च रोजी गोंदिया तालुक्यात महिला व पुरुष मॅरेथॉन घेण्यात आली.तरुणाच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार रमेश कुथे, जिल्हा परिषद सभापती संजय टेम्भरे, जिल्हा परिषद सभापती रुपेश कुथे, भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलंका, डॉ. प्रशांत कटरे, संजय कुलकर्णी, राजेश चतुर, दीपक कदम, गजेंद्र फुंडे, जयंत शुक्ला, भावना कदम, निर्मला मिश्रा, गोल्डी गावंडे, अंकित जैन, अशोक जयसिंघनी, तिजेश गौतम, बबली ठाकूर,  बाबा बिसेन, बंटी पंचबुद्धे, शालिनी डोंगरे, पूजा तिवारी, प्रशांत बोरकुटे, चंद्रभान तरोने  व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.