गोरेगांव:- स्थानीक स्व. ब्रीजलाल कटरे हायस्कूल शहारवानीची विद्यार्थीनीने जिल्हा स्तरिय दौड़ स्पर्धेत उल्लेखनीय यश क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीड़ा परिषद व जिल्हा क्रीड़ाधिकारी कार्यालय गोंदिया च्य्या वतीने जिल्हा क्रीड़ा संकुल गोंदिया येथे आयोजित जिल्हा स्तरिय मैदानी स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी कु.मानसी संतोष पटले हिने 17 वर्षीय थ्री जंप स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून आपलं गाव,शाळा व गोंदिया जिल्ह्याचे नाव सन्मानित केले.वरील विद्यार्थिनी उपरोक्त स्पर्धेमध्ये विभागीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल
विद्यार्थिनीने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई- वडील, गुरुजन यांना दिला आहे.विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकरी एन.जे.शिरसाटे प. स. गोरेगाव, तालुका क्रीडा संयोजक रंगारी मॅडम,संस्थेचे अध्यक्ष टी. बी. कटरे ,
शाळेचे मुख्याध्यापक आर. वाय.कटरे,क्रीडा शिक्षक के.के. यादव शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.