टेनिस छत्रपती संभाजी नगरच्या प्रणव कोरडे चा अहवाल मानांकित इग्नेश पंपारी ला पराभवाचा धक्का देऊन उपांत्य फेरीत प्रवेश

0
2

छत्रपती संभाजीनगर-इंदोर येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया लेवलच्या आयटा वन लाख टेनिस स्पर्धेच्या फेरी छत्रपती संभाजी नगरच्या प्रणव कोरडे यांनी तामिळनाडूचा अव्वल मानांकित खेळाडूला इग्नेशला पंपारी 6-1,6-4 असा सहज पराभव करून दणदणीत सुरुवात केली आहे.
ऑल इंडिया टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित पुरुष गटातील वन लाख स्पर्धेच्या पात्रता फेरी प्रणव कोरडे यांनी सलग चार सामने जिंकून मुख्य फेरी प्रवेश केला आहे . मध्य प्रदेश टेनिस असोसिएशन तर्फे आयोजित वन लाख टूर्नामेंट पुरुष गटाची टेनिस स्पर्धा इंदोर येथे इंदोर टेनिस क्लब येथे आयोजित केली आहे.
इंदोरंस मराठवाडा सेंटरचा खेळाडू प्रणव कोरडे यांनी पात्रता सामन्यात दुसऱ्या फेरीत दिल्लीच्या आदित्य चोप्राचा ९-३ व तिसऱ्या फेरीत मोहम्मद असीमचा ९-१ तसेच स्पर्धेच्या अंतिम पात्रता सामन्यात मध्य प्रदेशचा अव्वल मानांकित खेळाडू उत्कर्ष तिवारी याचा ६-३,६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून सहज विजय संपादन करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला होता.
प्रणवची ही दुसरीच पुरुष स्पर्धा आहे याआधी त्याने जूनियर स्पर्धा गाजवलेल्या आहेत दुसऱ्या अशा मोठ्या पुरुष गटाच्या टेनिस स्पर्धेत सहभागी होऊन सलग चार पात्रता सामने जिंकून मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश करून सणसणाटी निर्माण केली आहे तसेच प्रणव कोरडे यांनी आपला परफॉर्म कायम ठेवून मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात प्रणव कोरडे यांनी तेलंगणाचा टॉप रँकिंग खेळाडू व आयटीयफ(ITF) प्रो रँकिंग असलेला अव्वल मानांकित खेळाडू आतुर बाबाजी शिवा याचा ७-५,६-०,७-५ असा तिसऱ्या सेटमध्ये पराभव करून धुमधडाक्यात सुरुवात केली आणि आज मंगळवारी स्पर्धेच्या उपांत्य पूर्व सामन्यात त्याने अव्वल मानांकित तामिळनाडूचा खेळाडू इग्नेश पंपारी याचा ६-०,६-४असा सहज पराभव केला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तसेच स्पर्धेमध्ये सणसणाटी निर्माण केलीआणि आपली विजेतेपदाच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू केली . प्रणव कोरडे यास इंडोरन्स मराठवाडा एम एस एल टी ए सेंटरने स्वागत केले असून हा त्या सेंटर चा खेळाडू असून हा छत्रपती संभाजी नगरचा जूनियर गटामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि प्रणव कोरडे यास श्री गजेंद्र भोसले सर यांनी प्रशिक्षण दिलेले आहे व देत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणवची घोडदौड चालू आहे तसेच हा अतिशय मेहनती आणि कष्टाळू खेळाडू आहे त्याने आपला ठसा अनेक स्पर्धांमधून दाखवला आहे. इंदुरान्स कंपनीने तसेच पुढील मॅचेस साठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहे