राष्ट्रीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ छत्तीसगढला रवाना

0
14

गोंदिया, दि.4 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया च्या विद्यमाने भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल 14 वर्ष मुले व 17 वर्ष मुलींचे राष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीर दिनांक 31 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी 2024 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे पार पडले.

        राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा राजनांदगाव (छत्तीसगढ) येथे दिनांक 4 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी बास्केटबॉल खेळाचे 14 वर्ष मुले व 17 वर्ष मुलींचा संघ दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी रवाना करण्यात आला.

        राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेकरीता महाराष्ट्रातून 14 मुलांमध्ये इमरान रझाउल्ला अंसारी, आराध्य आशिष मोरे, शिवम अधवेशकुमार यादव, मोहम्मद अली बकुकर शेख, अनुज राजेश माने, प्रसन्न सुनिल शिंदे, आर्दुल दत्तात्रय कदम, धैर्यशील रामेश्वर पाटील, केविल जेगदिसन नाडार, वेदांत भरत आरडे, अश्विन रमेश यादव, गौतम संदिप वरद तर 17 मुलींमध्ये आर्या शेखर भावे, तनिष्का शशांक राऊत, अन्वी आदित्य कुलकर्णी, हर्षदा बाबाशो शेडके, तनिष्का प्रदिप जगताप, तनिष्का प्रशांत सोनवाने, आर्या मनोज भालेकर, स्वरा समीर वाघ, वेदांती रामदास जोशी, रिध्दी अनमोल बोरकर, रेवा अमित कुलकर्णी, नंदिनी नितीन चाळक यांची निवड करण्यात आली असून त्यात 12 मुले व 12 मुली असे एकूण 24 खेळाडू, 2 प्रशिक्षक व 1 संघ व्यवस्थापक यांचा समावेश आहे.

         राष्ट्रीय स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबिरामध्ये मुलांसाठी तौपिक खान तर मुलींसाठी मुद्रा अग्रवाल यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी ए. बी. मरसकोले, रविंद्र वाळके, विनेश फुंडे, आकाश भगत, शिवचरण चौधरी, किशन गावड, जयश्री भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.