२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव ; ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यातील पहिल्या क्रीडा दिनाला सुरुवात

0
1

नाशिक, 16 जानेवारी, :- ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन (15 जानेवारी) हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आज राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्यातील पहिला क्रीडा दिन साजरा करण्यात येत असून यादिनानिमित्त राज्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त युवाग्राम,  हनुमान नगर येथील सुविचार कक्षातील कार्यक्रमात आजचे प्रमुख अतिथी अभिनेता राहुल बोस यांच्या मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदि  उपस्थित होते.

या खेळांडूचा करण्यात आला सत्कार
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू कविता राऊत, टेबल टेनिसपटू नरेंद्र छाजेड, हँडबॉलपटू साहेबराव पाटील, तलवारबाजी पटू अशोक दुधारे, अजिंक्य दुधारे, अस्मिता दुधारे, राजू शिंदे, व्हॉलीबॉल पटू आनंद खरे, अविनाश खैरनार, रोइंगपटू अंबादास तांबे, वैशाली तांबे, दत्तू भोकनाळ, कुस्तीपटू गोरख बलकवडे, पॅरा एशियन सुवर्णपदक प्राप्त खेळाडू दिलीप गावित, योग अभ्यासात गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या प्रज्ञा पाटील आदी पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.