राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत लातूर विभाग अव्वल

0
2

*** अमरावती,नाशिक संघाचीही उत्तम कामगिरी

* विजयी संघांना पारितोषिकाचे वितरण
वाशिम दि.२९– क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम तथा वाशिम जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त वतीने कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेचा २९ जानेवारी रोजी समारोप झाला.या स्पर्धेत मुले व मुलीच्या तीनही वयोगटातील बक्षिसे पटकाविण्यात लातूर विभाग अव्वल ठरला.अमरावती व नाशिक विभागाच्या संघाने उत्तम कामगिरी केली.
     १४,१७ आणि १९ अशा तीन वर्षे वयोगटात ही स्पर्धा झाली.राज्यातून ४८ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ज्यामध्ये एकूण ५७६ खेळाडू सहभागी होते.१४ वर्षाआतील मुलामध्ये प्रथम क्रमांक लातूर विभाग, द्वितीय क्रमांक नाशिक आणि तृतीय क्रमांक मुंबई विभागाने पटकावला.
            मुलींमध्ये प्रथम अमरावती, द्वितीय क्रमांक पुणे व तृतीय क्रमांक नाशिक विभागाने मिळवला.
१७ वर्षे वयोगटात मुलामध्ये लातूर विभाग प्रथम,अमरावती द्वितीय तर तृतीय क्रमांक पुणे विभागाने पटकावला.मुलीच्या स्पर्धेत लातूर विभाग प्रथम,नाशिक द्वितीय व अमरावती विभाग तृतीय ठरला.१९ वर्षे वयोगटातील मुलामध्ये नाशिक विभागाने पहिला,लातूर विभाग दुसरा व संभाजीनगर विभागाने तिसरा क्रमांक पटकावला.मुलींमध्ये अमरावती,पुणे व लातूर विभागाने अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
            बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे आट्यापाट्या महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर गुल्हाने, प्राचार्य नागरे,प्राचार्य डॉ.अशोक देवरे, प्राचार्य बाळासाहेब गोटे,प्रा.संतोष राठोड,वाशिम जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन अध्यक्ष संजय मिसाळ, सचिव प्राचार्य विवेक गुल्हाने,तालुका क्रीडा अधिकारी सोनकांबळे,बोदडे, भारत वैद्य,प्रकाश मोरे,विकास तिडके,महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या असोसिएशन सहसचिव शरद पवार, धर्मेंद्र काळे,अनिल माकडे,ऋषिकेश देशमुख,प्रा.अनिल बोंडे व मोटघरे उपस्थित होते.
            याप्रसंगी सामन्यात पंचाची भूमिका बजावणारे २९ जणांचा सन्मान करण्यात आला.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अजीत बुरे,महेश ठाकरे,उमेश शिंदे,हेरम गर्दे,ऋषिकेश देशमुख,सौरव ताजने,हर्ष काकडे यांच्यासह जिल्हा क्रीडा परिषद कर्मचारी,उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय विभाग,नगर परिषद व पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.
*जिल्हाधिकारी यांनी घेतला सामन्याचा आनंद*
राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत सहभागी संघ व खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस.यांनी दोनदा भेट दिली. २८ जानेवारीच्या भेटीप्रसंगी त्यांनी एका सामन्याचा आनंद लुटला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे,नायब तहसीलदार विलास शिंदे,तलाठी धानोरकर, पत्रकार व इतर क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.