मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0
14

गोरेगाव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगावचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व स्पोर्ट्स डे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी आर.आर.अगडे अध्यक्ष सेवा संघ तर उदघाटक म्हणून प्रा. एस. एच. भैरम उपप्राचार्य जगत कॉलेज गोरेगाव हे होते. तसेच लोकेश कटरे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, प्रा. आर. डी. कटरे सचिव श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगाव, प्रा. आर. एम. गहाणे, प्रा. मेश्राम, सुनिलकुमार ठाकूर विषयतज्ज्ञ गोरेगाव, सौं सुरेखाताई आर. कटरे संचालिका श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगाव, सी. बी. पटले प्रशासकीय अधिकारी मोडल कॉन्व्हेंट गोरेगाव, सौं सी. पी. मेश्राम प्राचार्या मॉडेल कॉन्व्हेंय गोरेगाव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्या सौं सी पी मेश्राम यांनी केले.तसेच प्रमुख अतिथी लोकेश कटरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्नेहसंमेलनाचे महत्व विध्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासाबरोबरच कितपत महत्वाचे असते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रा. आर. डी कटरे सर यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना अभ्यासाबरोबच खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक महोदय प्रा. एस. एच. भैरम व अध्यक्ष म्हणून उपस्थित आर. आर. अगडे यांनी सुद्धा मंचवरून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांच्या शुप्त गुंणांना वाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या जिवनात प्रत्येक भागात उंच भरारी घेयाकरिता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. स्पोर्ट डे च्या माध्यमातून विविध खेळाचे तसेच स्नेहसंमेलणाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम गोंडी नृत्य, देशभक्ती पार नृत्य, अनेक राज्यावर वर आधारित नृत्य, एकाकिका, यांचे आयोजन शाळेकडून कारण्यात आले. शाळेकडून विविध क्षेत्रात प्रविण्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार पाहून्यांच्या हस्ते करण्यात आले. अवघ्या साढे तीन वर्षात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविल्याबद्दल मॉडेल कॉन्व्हेंट चा विध्यार्थी अनुदीप अंकुश चौहांन, गणित प्रविण्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल कु नंदिनी नाथराव मुंडे, वर्ग 12 मधून तालुका प्रथम कु. प्रतीक्षा उमराव बोपचे, शाळा द्वितीय अंजली जगदीश बोपचे, वर्ग 10 वी तुन शाळा प्रथम तन्वी धर्मेंद्र कावळे, द्वितीय वैशाली जगदीश बोपचे यांना मोमेनटो देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सायंश ऑलिम्पियाड द्वारा आयोजिय जनरल नॉलेज परीक्षेत प्रविण्याप्राप्त विद्यार्थिनी कु श्रीष्टी राधेश्याम मिश्रा हिचा गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला . त्याच्यबरोबर रंगोत्सव सेलेब्रेशन मुंबई द्वारा आयोजित स्पर्धेत गोल्ड मेडल ब्रांझ मेडल तसेच प्रसस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इंटर स्कूल स्पर्धा मध्ये विजयी विध्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी, पालक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शाळा प्रमुख कु निधी राहुल कटरे व सोहम सुरेंद्रनाथ कतलाम यांनी केले.