… अरुणनगर येथे आठवडाभर रंगणार फुटबॉलचा थरार..
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )-जगासह भारतातील युवकांनाही क्रिकेटने भुरळ घातली आहे.बाल,महिला, पुरुष आज सारेच क्रिकेट खेळण्यासाठी धडपडतात.याही परिस्थितीत अनेक देशात फुटबॉल हा खेळ प्रसिद्ध असला तरी भारतात शहरी भागात हा खेळ पहावयास मिळतो.तरीपण खेड्यापासून शहरापर्यंत सगळेच क्रिकेटचे दिवाने. या क्रिकेटच्या जंगलात फुटबॉलची परंपरा जोपसित नवा आदर्श निर्माण करून बंगाली बांधव फुटबॉपटू घडवीत असल्याचे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
ते अरुणनगर येथे युवा सांस्कृतिक आणि क्रिडा असोसिएशनच्या वतीने आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलत होते.सरपंचा मिंती किर्तूनिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उपसरपंच हिरामण मंडल, जिप सदस्य जयश्री देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते,माजि जि. प.सभापती उमाकांत ढेंगे,नपं सभापती राधेश्याम भेंडारकर,तमुस अध्यक्ष प्राणगोपाल दास,पोपा बिरेन सरकार, सुचित्रा फारे, चंपा मंडल, बाबुल बनिक,मृनाल राय, बिधान राय, हिरालाल मिस्त्री उपस्थित होते.
बडोले पुढे म्हणाले, फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ग्रामीण भागात दिमाखात संपन्न होत आहे.गत वीस वर्षापासून हे मंडळ निरंतर स्पर्धा घेत आहे.या स्पर्धेत भारतात शिक्षण घेणारे विदेशी विद्यार्थी सहभागी होतात ही अभिनंदनाची बाब आहे.बंगाली बांधव खूप मेहनती आहेत.त्यांनी उत्कृष्ट बागायती शेतीकरून दाखविली.या ठिकाणी उत्कृष्ट फुटबॉल ग्राउंड तयार करण्यासाठी प्रयत्न करणार.या परिसरात ग्राम संघाची इमारत मंजूर करण्यात आली असून गारमेंट उद्योग उभारून महिलांना रोजगार उपलब्ध करू.खेळाडूंनी खेळ भावनेनेच खेळ खेळावा असे आवाहन केले.
आज गुरुवार (8) पासून 15 ऑगस्टपर्यंत भरपावसात हा थरार रंगणार आहे.
स्पर्धेचे हे विसावे वर्ष असून नागपूर मुंबई, छत्तीसगड,मध्यप्रदेशासह महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून 42 चमुंनी सहभाग घेतला आहे.स्पर्धेत शहरी विजेत्या चमुंना 50 हजार,25 हजार आणि 15 हजार रुपयांचे बक्षीस तर ग्रामीणसाठी
25-15-10 हजारांचे पारितोषिक मिळणार आहे.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष भोलाराम दास, उपाध्यक्ष शशी गायन, प्रशांत वैद्य,गोविंद हलदार, तपण बॅनर्जी,दीपानकर रॉय,देवकुमार सरदार,भदत्त रॉय आणी सदस्य परिश्रम घेत आहेत.