सडक/अर्जुनी.-आदिवासी बांधव हे या देशातील मुलनिवासी आहेत. जल जमीन जंगल ही समाजाची आधारशिला आहे. या समाजाने आपली संस्कृती आजही जोपासली आहे.आदिवासी समाजाला सन्मानाने जगता यावे म्हणून आदिवासी समाजातील महापुरुषांनी मोठी क्रांती केल्याचा इतिहास कुणीही विसरु शकत नाही.भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींचे दैवत आहेत.अल्प काळ जगले असले तरी आजही त्यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायीच आहेत.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका,संघटीत व्हा,आणि संघर्ष करा हा मंत्र दिला.आज आदिवासी समाज या मंत्राचा उपयोग करून उच्च पदावर झेप घेत आहे. या समाजाने निसर्गाला आपले दैवत मानले आहे.त्यामुळे हा समाज निसर्ग पुजक आहे,असे प्रतिपादन माजी सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत सडक/अर्जुनी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजीत जागतीक आदिवासी दिनाच्या व क्रांतीदिनानिमीत्य ता.8 कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून राजकुमार बडोले बोलत होते.सर्वप्रथम अमर शहिद भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दिपप्रज्वलीत करुन महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला सडक/अर्जुनी भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये,प्रल्हाद वरस्ते,पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये,सपनाताई नाईक,विलास वट्टी, सुभाष कुळमेते, सुरेंद्र बिसेन, अनंत ठाकरे, संदिप रामटेके, प्रशांत शहारे, उमेश पंधरे,निकेश गेडाम, सत्यवान परशुरामकर, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तथा ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी समाज हा निसर्ग पुजक :- माजी मंत्री राजकुमार बडोले
वाढदिवसाच्या शुभेच्छा