राज्यस्तरीय शालेय कुस्ती आणि बॅडमिंटन स्पर्धेचे परभणी शहरात आयोजन

0
67
परभणी, दि. 19- : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद परभणी, जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी व जिल्हा कुस्ती असोसिएशन आणि जिल्हा बडमिटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरात परभणी जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे दिनांक 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान 14 वर्षातील मुले व मुली यांच्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन, तसेच दिनांक 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान 14, 17 व 19 वर्षा आतील मुली यांच्या शालेय राज्यस्तरीय बंडमिटने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी शहरात होत असलेले या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विभागातील खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक राज्य व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत जिल्ह्यामध्ये असे खेळाडू निर्माण व्हावे. खेळाचे वातावरण या ठिकाणी तयार व्हावे तसेच प्रशिक्षक व खेळाडूंना प्रोत्साहनही मिळावे. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांने एक तरी खेळ खेळला पाहिजे जेणेकरून आपले शरीर व स्वास्थ्य सुदृढ होण्यास मदत होईल. घराघरांमध्ये प्रत्येक मुलांनी खेळ हा खेळलाच पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब सकारात्मक असली तरी यामध्येही करिअर करता येऊ शकते हा ही एक चांगला मार्ग आहे. शासनाच्या अनेक योजना खेळाडूंसाठी आहेत या बाबतची माहिती असणे आवश्यक आहे हे वातावरण निर्मिती होण्यासाठी अशा स्पर्धा जिल्ह्यात भरवल्या तर नक्कीच परभणीकरांना लाभ होऊ शकतो. सोबतच अशा स्पर्धांमुळे कित्येक वर्षापासून वापरात नसलेली वास्तू स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर हे ही अद्यावत परिपूर्ण सुविधा साठी सज्ज केले जाऊ शकते हा दृष्टिकोन ठेवून जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या स्पर्धा घेण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच टेबल टेनिसच्या राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या. कुस्ती व बॅडमिंटन या स्पर्धाही आता होत आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा संघटने मार्फत घेण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यातील क्रीडा संघटक, तालुका संयोजक, क्रीडाप्रेमी, खेळाडूंनी हया स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूं‌ना प्रोत्साहन द्यावे. या खेळ स्पर्धाचां आनंद जास्तीत जास्त परभणीकरांनी आपल्या पाल्यांसह घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती. कविता नावंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.