भंडारा,दि.22 : युवकांचा सर्वागिण विकास करणे संस्कृती परंपरा जतन करणे,युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देने व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हास्तर,विभागस्तर,राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात येते. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी या कालावधीत होणार आहे.
सन 2024-25 यावर्षात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन हे विज्ञान व तंत्रज्ञान या नवसंकल्पनावरआयोजित करावयाचे आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान याचा वापर या संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत प्रदर्शने, सांस्कृतीक स्पर्धा, लोकगीत, लोकनृत्य, कौशल्यविकास स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्य स्पर्धा, कविता, हस्तकला, वस्त्रोद्योग अशा विविध सर्वांचा समावेश आहे.
युवा महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकतील स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूना शासनाद्वारे विविध पारीतोषीक तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. जिल्हास्तरयुवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक व युवती यांची विभागस्तरावर निवड करण्यात येते व विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त प्राप्त करणाना युवक व युवती यांची विभागस्तरावर निवड करण्यात येते व विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या युवक युवती याची निवड राज्यस्तरीय युवा व युवती यांची निवड केली जाते असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे यांनी सांगीतले,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारातर्फे आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन विज्ञान व तंत्रज्ञान या मधील नवसंकल्पना यावर आयोजित करावयाचे आहे. यामध्ये भंडारा जिल्हयातील संगीत महाविद्यालय, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळ, सास्कृतीक मंडळ,जिल्हयातील इंजिनियरींग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था इत्यादींनी 15 ते 29 वयोगटातील व युवक व युवती यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती, लतिका लेकुरवाळे यानी केले आहे.
भडारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळ, वैयक्तीक युवक-युवती यानी आपले प्रवेश अर्ज 27 नोव्हेंबर, 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोद घ्यावी.
अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती. लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. आकाश गायकवाड, क्री.अ.9130253473, श्री. प्रतिक लाडे, की. मा-9505301184 व श्री. पराग गावंडे, या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती, लतिका लेकुरवाळे यांनी सांगीतले.