क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला व गुणांना वाव मिळतो:- इंजि यशवंत गणविर

0
60

अर्जुनी मोरगाव:-तालुक्यातील देवलगाव येथे तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते व पंचायत समितीच्या सभापती सविता कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी आपलं मत व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया च्या वतीने सर्वप्रथम केंद्र स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नंतर आजपासून आपल्या तालुक्यातील सर्वच केंद्रातील चमु या तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उपस्थित आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना प्रदर्शित करण्याची संधी मिळाली व विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करुन घ्यावं.शिक्षकांनी सुद्धा आपला विद्यार्थी काय करु शकतो त्याला कशात रुची आहे याची खात्री करून विद्यार्थ्यांला गगनभरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
पुढे बोलताना म्हणाले की,आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे विज्ञानाचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे.शालेय अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे.पण हे सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेच्या स्वरुपात असुन स्पर्धेमधे जय पराजय होत असतो, त्यामुळे कुणालाही कमी लेखू नये आणि पराभुत झालेल्या चमुने खचुन न जाता आपण कुठं कमी पडलो आपण कुठ चुकलो याच आत्मचिंतन करुन उणीवा भरुन काढण्यासाठी प्रयत्न करावे.कारण प्रयत्न वाळुचे कण रगडीता तेलही गळे,आपण जर प्रयत्न करत राहिले तर वाळुतुन सुद्धा तेल गाळु शकतो म्हणुन प्रयत्न करत राहा यश नक्कीच मिळेल.त्याचप्रमाणे शिक्षकांनी सुद्धा ज्या प्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन मडके घडवतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत विद्यार्थी घडवावे जेणेकरून तेच विद्यार्थी उद्याचे सुजाण व सृजनशील नागरीक घडवून आपला व आपल्या पालकाचा आपल्या क्षेत्राचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा नावलौकिक करतील.असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे ध्वजारोहण पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, जयश्री देशमुख,पोर्णिमा ढेंगे, कविता कापगते,श्रिकांत घाटबांधे, पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, नूतन सोनवाने,कुंदा लोगडे,पुष्पलता द्रुगकर, भाग्यश्री सयाम,नाजुक कुंभरे,शालीनीताई डोंगरवार, खरेदी विक्री सभापती केवळराम पुस्तोडे, सरपंच दिपाली कापगते, उपसरपंच तामदेव कापगते, विजेंद्र राउत अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,दयाराम लंजे सरपंच परसोडी, गटविकास अधिकारी शंकर वैद्य, गटशिक्षणाधिकारी अनिल चौव्हान,पत्रकार अमर ठवरे, लक्ष्मीकांत नाकाडे सरपंच माहुरकुडा,सर्व गावातील सरपंच उपसरपंच व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.