खेळाची आवड निर्माण होण्यासाठी क्रीडा सप्ताहाचे मोलाचे योगदान-जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ

0
18
क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न
वाशिम,दि.१९ डिसेंबर-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होणाच्या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १८ डिसेंबर २०२४ या दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा उपक्रम व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ उपस्थित होते.त्यावेळी ते बोलत होते.राधादेवी बाकलीवाल विद्यालयाचे प्राचार्य धनंजय वानखडे, शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता, क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे तसेच संजय वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
     या क्रीडा सप्ताहामध्ये चित्रकला, चॉकबॉल, बैंडमिटन, आर्चरी, कराटे, किकबॉक्सींग, बॉक्सींग व इतर क्रीडा स्पर्धाचे तसेच विविध उपक्रम, व्याख्यान आयोजित करण्यात येवुन विविध क्रीडा प्रकारामध्ये विजयी / उपविजयी तथा प्रथम द्वितीय / तृतिय क्रमाकाचे खेळाडू विद्यार्थ्यांना मोमेन्टो / ट्रॉफी व मेडल तथा प्रमाणपत्र वितरीत करुन गौरव करण्यात आला तसेच सर्व सहभागी खेळाडुंना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सर्वप्रथम योग चिकित्सक डॉ तेजस्वीनी अफुणे यांनी मान्यवाराचे स्वागत आणि कार्यक्रमांची सुरुवात गायत्री मंत्राने केली. त्यानंतर खेळाडुंना आहाराविषयक माहिती दिली.
    श्रीमती गुप्ता यांनी खेळाडुंचे मनोबल वाढवुन क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन जिल्हयाचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले. क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे , संतोष फुपाटे , राज्य क्रीडा मार्गदर्शक (बॉक्सींग) अक्षय टेंभुर्णीकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक पुजा मटकर, वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, सुशांत कलढोणे, भारत वैद्य, कलिम मिर्झा, विकास तिडके, प्रकाश मोरे, शुभम कंकाळ आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्वेता वालदे यांनी केले.