मृतक गुलाबबाई चोपडा यांचे त्यांच्या परिवाराच्या संमतीने केले नेत्रदान

0
90

    गोंदियादि.19डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे.दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही.परंतु, या अतिशय महत्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही.सध्या मोबाईल, इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले, तरी त्याच्यामुळे लोकांना अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.भावी पिढीने अध:कारमय जग प्रकाशमान करण्यासाठी नेत्रदान करण्याबाबत आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यावर विशेष जोर देण्यात येत आहे.मृतक गुलाबबाई चोपडा यांचे अकाली मृत्यू झाला.त्यांच्या परिवारातील सदस्यांनी लागलीच मृतकाचे नेत्रदान करुन मोलाचे काम केलेले आहे.
आज दि.19 डिसेंबर रोजी सेल्स टॅक्स कॉलनीतील गुलाबबाई चोपडा यांचे अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मृतकांचे नेत्रदान करण्याचे ठरवले इतक्या कठीण परिस्थिती ही नेत्रदानाची इच्छा दर्शवली व घरातील परिवारातील सदस्य नरेंद्रकुमार चोपडा, संतोष चोपडा, राजेंद्र चोपडा,पदम चोपडा व अमन चोपडा यांनी नेत्र समुपदेशक भाविका बघेले यांच्याशी संपर्क साधला.केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रदान समुपदेशक भाविका नागपुरे/बघेले व नेत्रदान सहाय्यक रीता विजय अरोरा यांच्या सहायाने नेत्रदानाची प्रक्रिया ही पूर्णपणे पार पाडण्यात आली.के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागातील नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले,रिता अरोरा यांच्या पथकाने संबधित परिवाराशी संपर्क साधुन नेत्रदान बाबत प्रक्रिया पुर्ण करुन दोन्ही नेत्र शासकिय नेत्रपेढी मध्ये संकलन केले. के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागाकडुन शासनामार्फत नेत्रदान केल्याबद्दल चोपडा परिवाराला प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी चोपडा परिवाराने नेत्र दान केल्याबाबतचा आदर्श लोकांनी डोळ्यासमोर ठेवुन नेत्रदान करण्याचे आवाहन समस्त गोंदियावासियांना केलेले आहे.
मृत्युनंतर ते तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.
तुम्हीही करू शकता नेत्रदान
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.
कसे होते नेत्रसंकलन
नेत्रदानाही इच्छा व्यक्त केलेली व्यक्ती मृन पावली आणि त्यांच्या नातेवाईकांनी कळवले तर हे नेत्रसंकलन रुग्णालयात जावुन करण्यात येते.एमबीबीएस नोंदणीकृत डॉक्टरच नेत्र संकलन करू शकतात. यासाठी दहा में पांच मिनिटाचा कालावधी लागतो. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यादीही नेत्रपेढीकडे तयार असते.पुरस बुबुळ बाटलीत 48 तासापर्यंत ठेवता येतात. तसेच ईतर विशेष रसायनामध्ये दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येतात. बुबुळ प्रत्यारोपित व्यकतीला याबाबत काहीही माहिती देण्यात येत नाही. मृत्युपूर्व नेत्रदानाचा संकल्प नसला तरीही मृतांच्या जवळील नातेवाईकही संमती देऊ शकतात.