राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा वरचष्मा

0
27

राज्याच्या महिला-पुरूष संघाकडे विजेतेपद

गोंदिया : राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पोर्ट असोसिएशन व महाराष्ट्र ब्लाइंड स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने गोंदिया येथे २५ ते २८ डिसेंबर दरम्यान चौथ्यी राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १७ राज्यातील दृष्टीबाधित गोल बॉल संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाले. पुरूष गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने हरीयाणा तर महिला संघाने गुजरात संघाचा पराभव करीत विजेते पद पटकाविले. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दबदबा पहावयास मिळाला.

गोंदिया येथे २६ ते २८ डिसेंबर दरम्यान चौथी राष्ट्रीय पॅरागोल बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, हरीयाणा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, यासह एकूण १७ राज्यातील महिला-पुरूष संघाने सहभाग नोंदविला होता. सर्व साखळी सामन्यात (Maharashtra team) महाराष्ट्राच्या महिला व पुरूष या दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम फेरी गाठली. २८ डिसेंबर रोजी आयोजित अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या पुरूष संघाने हरीयाणाच्या संघाला ९-६ च्या फरकाने पराभूत केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरूष संघाने विजेते पद पटकाविले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महिला संघाचा अंतिम सामना गुजरात संघाशी झाला. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सुरूवातीपासूनच गुजरात संघावर वर्चस्व गाजविणे सुरू केले. परिणामी गुजरात संघावर १५-९ च्या फरकाने विजय मिळविला. या स्पर्धेत राज्याच्या महिला-पुरूष या दोन्ही संघाने आपले वर्चस्व गाजविले. ही स्पर्धा महिला कोच तसेच पॅरागोलबॉल स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव आरती लिमजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Maharashtra team

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची निवड

सन २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या (Maharashtra team) स्पर्धेत भारताचा संघ सहभागी होणार आहे. या राष्ट्रीय संघासाठी सहा खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती आरती लिमजे यांनी दिली आहे.

सुरूचीने केले गोंदियाचे नाव लौकिक

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॅरागोल बॉल स्पर्धेत गोंदियाचे सुरूची गुप्ता हिची निवड करण्यात आली होती. सुरूची गुप्ता हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सुरूची गुप्ताने गोंदियाचे नाव लौकिक केले आहे.