उमरखेड तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा २०२४-२५ची मानकरी ठरली मुरली शाळा

0
56

*#आम्ही बनलो चॅम्पियन्स*…शिक्षण विभाग यवतमाळ

उमरखेड,दि.६- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुकास्तरीय खेळ व क्रिडास्पर्धा २०२४-२५ या वर्षाचे आयोजन करण्यात आले होते.त्या क्रिडा स्पर्धेत उमरखेड तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील आणि टोकावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरली(केंद्र-जेवली)ने सर्वच खेळात विजय मिळवित यंदाची मानकरी ठरली आहे
या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सर्वच स्तरातून कौतुकास्पद खेळ करत उपस्थितांची मने जिंकली.तालुक्यातून चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवण्याचा मान पहिल्यांदाच मुरली शाळेला मिळाला असून विद्यार्थ्यांनी दाखवलेली चुणूक,चमू शिक्षक,सहकारी शिक्षकांचे परिश्रम,पालकांचा विश्वास व उपस्थितांची प्रेरणा या सर्वांचा परिपाक म्हणजे आजचे यश आहे.
तालुक्याचे कर्तव्यदक्ष ऊर्जावान गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड,शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद कांबळे,जेवली केंद्राचे केंद्रप्रमुख भारत भिंबरवाड,क्रीडांगणावरील सर्व मैदान प्रमुख, मैदानावरील सर्व पंच,सर्व उपस्थित शिक्षक तसेच मुरली शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक मारोती केंद्रे, मारोती धनवे ,गोविंद कोरपकवाड, क्रिडा शिक्षक किरणकुमार कारलेवाड,शिवलिंग बाचे,क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर पांपटवार,बालाजी चव्हाण,बजरंग जयस्वाल,कैलास जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल चव्हाण,सर्व सदस्यांच्या सहकार्याने हे यश शाळेला मिळाल्याचे सांगत जिल्हास्तरावरही यश मिळवू असे क्रिडा शिक्षक किरणकुमार कारलेवाड यांनी म्हटले आहे.
मुरली शाळेच्या खेळाडू विद्यार्थांनी मिळवलेली पदके खालील प्रमाणे

खो खो लहान गट मुली – प्रथम
२०० मी लहान गट मुले- प्रथम
१०० मी लहान गट मुली – द्वितीय
लांब उडी मोठा गट मुली – द्वितीय
रिले लहान गट मुली – द्वितीय
रिले मोठा गट मुली – प्रथम
रिले लहान गट मुले – द्वितीय
२०० मी लहान गट मुली – द्वितीय
लहान गट खोखो मुले – द्वितीय
खो खो मोठा गट मुली – प्रथम