25.3 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home क्रीडा साक्षी पंधरे व अल्का मरसकोल्हेची पहिल्या ट्रायबल खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड

साक्षी पंधरे व अल्का मरसकोल्हेची पहिल्या ट्रायबल खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड

0
65

देवरीः शालेय शिक्षण वक्रीडा विभाग, क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर अॅथलेटिक्स आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती येथे धनुर्विद्या या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या राज्यस्तरीय निवड चाचण्या पार पडल्या.
धनुर्विद्या या स्पर्धेत कोयलारी शासकीय आश्रम शाळेच्या साक्षी संजय पंधरे हिने रिकर्व राऊंड गटात तृतीय क्रमांक पटकावला. तर मैदानी अॅथलेटिक्स स्पर्धेत बीजेपार शासकीय आश्रम शाळेच्या अल्का रामदास मरसकोल्हे हिने ८०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही प्रतिभावान विद्यार्थिनींची निवड छत्तीसगढ येथे १४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या पहिल्या ट्रायबल खेलो इंडिया गेम्ससाठी झाली आहे. दोन्ही विद्यार्थिनींनी हे यश आई-वडील, प्रकल्प अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक, मुख्याध्यापक आणि आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांना समर्पित केले आहे.
हे यश मिळवण्यामागे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्या ‘एक आश्रमशाळा एक खेळ’ या सूक्ष्म नियोजनाची मोठी भूमिका आहे. क्रीडा प्रशिक्षकांची सातत्यपूर्ण उपलब्धता, विशेष प्रशिक्षण, संतुलित आहार आणि शाळेचे मुख्याध्यापक अशोक इस्कापे व सदानंद भुरे यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. सायली चिखलीकर , सुनील भुसारी, तुलसीदास बघाडे, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच दोन्ही आश्रम शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधिक्षिका व कर्मचारी यांच्या अथक सहकार्यामुळे हे यश शक्य झाले.

blank