गोंदिया,दि.२०ः गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व लहिटोला(पांढराबोडी)चे माजी सरपंच तसेच श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ गोविंदपूरचे सचिव भोजरा चैतरामजी चुलपार यांचे १९ जानेवारीला निधन झाले.त्यांच्यावर आज २० जानेवारीला त्यांच्या मुळगावी लहिटोला येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.





