जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन..
भंडारा दि.३१- शिक्षण विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने आयोजित सन २०२५-२६ चा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आज ३१ जानेवारी २०२६ रोजी कोच्ची (ता. लाखांदूर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण व मशाल प्रज्वलन करून या त्रिदिवसीय महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटकीय भाषणात पंकज भोयर यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. ते म्हणाले, “शासन भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देते, परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळांचा दर्जा उंचावण्याचे खरे काम शिक्षकच करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता सीबीएसईच्या धर्तीवर सेमी-इंग्रजी शिक्षण दिले जात आहे. तसेच, राज्य शासनाने केंब्रिज विद्यापीठाशी केलेल्या करारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अध्यापन पद्धतीचा लाभ आता ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मिळेल.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी कोच्छी/दांडेगाव ग्रामवासीयांचे कौतुक करत म्हटले की, जिल्हास्तरीय महोत्सवाचे यजमानपद भूषवणे ही गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे आवाहन केले. यावेळी विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. कविता उईके आणि उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनीही सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
असा झाला सोहळा
सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले व देवी सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाची रूपरेषा मांडली.
या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, सभापती नरेश ईश्वरकर, आनंद मलेवार, शितल राऊत, अनिता नालगोपूलवर, जिल्हा परिषद सदस्य प्रियांक बोरकर, सरपंच सुरेखा देसाई, उपसरपंच मुरलीधर वावरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत सेलोटे, मुख्याध्यापक योगेश कुटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि साकोलीचे उपविभागीय अधिकारी निलेश कदम, तहसीलदार वैभव पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कुंभारे व वंदना भोवते यांनी केले, तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये यांनी मानले. या महोत्सवात जिल्ह्यातील तालुका स्तरावरील विजेते स्पर्धक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कुंभारे व वंदना भोवते यांनी केले, तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये यांनी मानले. या महोत्सवात जिल्ह्यातील तालुका स्तरावरील विजेते स्पर्धक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.