महेंद्र हेमणे यांना क्रीडा संघटक पुरस्कार

0
11

गोंदिया,दि.13 : राज्य शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय गोंदियाद्वारे क्रीडा क्षेत्रातील गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार कारंजा मैदान येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते गुणवंत क्रीडा संघटक पुरस्काराने महेंद्र हेमणे यांना सन्मानित करण्यात आले.
राज्य व राष्ट्रीय खेळाडू यांनी तयार केले असून राज्यस्तर स्पर्धा आयोजनात सहभाग, भरीव कामगिरी केलेली आहे. यावेळी साहाय्यक क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, नाजूक उईके, धनंजय बारसागडे उपस्थित होते. हेमणे सन्मानित झाल्याबद्दल डॉ.पुरुषोत्तम चौधरी, गजेंद्र फुंडे, सुनील पारधी, आशिषसिंह चव्हाण, कार्तिक पटेल, किशोर तवाडे, परमानंद फुंडे, अंकुश गजभिये, नितेश चुटे, प्रशांत निकुशे, शैलेंद्र फुंडे, पूर्वा फुंडे, अंजनकर, एम.पी.शेख, कावळे, गुप्ता, राजकुमार कुथे, राजेश चतुर यांनी त्यांचे अभिनंदन केले.