पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश

0
14

अर्जुनी मोरगाव ,दि.24 : आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी खेळात करियर घडवावे, या उद्देशाने शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. यात देवलगाव येथील नत्थू पुस्तोडे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.
१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैशाली हिचामी, वर्षा कचलामी अनुक्रमे प्रथम व द्वितीय आल्या. तर अजय खते याने तिसरा क्रमांक पटकाविला. ८०० मीटर दौड स्पर्धेत मुलींमधून विशाखा कोल्हे प्रथम तर मुलांच्या गटातून राहुल मिरी याने प्रथम क्रमांक पटकाविला. १५०० मीटर दौड स्पर्धेत महेश्वरी कुळयामी द्वितीय तर जाकेश उईके याने प्रथम क्रमांक मिळविला. ५००० मीटर दौड स्पर्धेत विश्वनाथ नरोटे याने प्रथम, मुलींमधून वर्षा कुचलामी प्रथम, रिलेमध्ये वर्षा कुचलामी, वैशाली हिचामी, रिना सोनकलंत्री, रामुना सोलकलंत्री यांनी प्रथम तर मुलांमधून अजय खते, मेहरु मडावी, महावीर सियाम, महेश मडावी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
अ गटातून १०० मीटर दौडमध्ये फुलवंती कोरचा तर मुलांमधून निखिल हिचामी यांनी प्रथम क्रमांक, अक्षय हिडामी द्वितीय क्रमांक, रिले दौडमध्ये अविनाश धिकुंडी, निखिल हिचामी, अक्षय हिडामी, आकाश तुलावी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
रिले दौड मुलांमधून विकास कोरेटी, भूपेश ताडामी, टिकाराम होळी, स्वप्नील उसेंडी तर मुलींमधून फुलवंती कोरचा, सुलोचना कोराम, सिंधू हाशमी, कविता मसराम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
ब गटातून १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सीमा गोळा प्रथम, रजवंती कोरचा द्वितीय तर मुलांमधून पवन सलामे तृतीय, ८०० मीटर दौडमध्ये मोनाली लुंगाटे प्रथम, नेहा पडोटी द्वितीय तर मुलांमधून अक्षरा हलामी तृतीय. १५०० मीटर दौडमध्ये भूमिता सोनकलश प्रथम, कोमल उईके द्वितीय, मुलांमधून दिलीप हिडामी द्वितीय, रिले दौड स्पर्धेत गीता कोरामी, राजवंती कोरचा, सीमा गोठा, मीरा नेताम प्रथम, मुलांमधून रिले दौडमध्ये गीता केरामी, रजवंती कोरचा, रेश्मा होळी, सीमा गोळा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नत्थुजी पुस्तोडे आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ठाणेदार स्वप्नील उनवणे, आश्रम शाळेचे संस्थापक केवळराम पुस्तोडे, मुख्याध्यापक मनोज कापगते, माध्यमिक विभागाचे प्राचार्य एम.पी. कुरुसुंगे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक विनायक लांजेवार, किशोर परशुरामकर, वाय.बी. कापगते, पी.एच. मेंढे यांचे कौतुक केले.