माहीने खेचून आणला विजयरथ

0
8

पर्थ – वेस्ट इंडिजच्या विरोधातील सामन्यात भारतीय संघाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने अश्विनच्या साथीने विजयरथ खेचून आणला आहे. ठरावीक अंतराने विकेट पडल्याने भारतीय संघावर चांगलाच दबाव आला होता. पण धोनीने संयमी फलंदाजी केली. अश्विनकडून मिळालेल्या साथीने त्याने हा विजयरथ खेचून आणला. तीन विकेट घेणारा शमी सामनावीर ठरला.भारताने 183 धावांचा पाठलाग करताना अत्यंत संयमी फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. रोहित आणि धवननेही फटकेबाजी केली नाही. विंडिजच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. टेलरच्या एका चेंडूवर धवनने एक चुकीचा फटका मारला आणि सॅमीने स्लीपमध्ये त्याचा झेल घेतला. त्यानंतर रोहित शर्माही टेलरच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्याला फक्त सात धावाच करता आल्या. विराट कोहलीने मैदानावर चांगला जम बसवला होता. पण आंद्रे रसेलच्या एका बाऊंसरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 33 धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य राहणेही लवकर बाद झाला. त्याचबरोबर सुरेश रैनाही फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला विंडिजच्या फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले. अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांनी स्मिथ आणि गेलला बांधून ठेवले. त्यामुळेच स्मिथ एक फटका मारताना झेलबाद झाला. शमीने त्याला बाद केले. त्यानंतर ख्रिस गेलचा एक झेल उमेश यादवने सोडला. त्यानंतर मोहीत शर्माने आणखी एक झेल घेण्याचा प्रय्तन केला. पण त्याला यश आले नाही. पण त्याने क्षणाचाही विलंब न करता चेंडू फेकला आणि सॅम्युअल धाव बाद झाला. त्यानंतर गेलचा आणखी एक झेल सुटला. नंतर मात्र गेलने फटकेबाजी सुरू केली. पण तसाच एक फटका मारताना त्याने चौथ्यांदा चेंडू हवेत टोलवला. यावेळी मात्र मोहीत शर्माने चूक केली नाही आणि गेल तंबूत परतला. त्यापाठोपाठ उमेश यादवच्या चेंडूवर रामदीन बोल्ड झाला. त्याला उमेश यादवने भोपळाही फोडू दिला नाही. तो शून्यावरच बाद झाला. त्यानंतर सिमन्स 9 धावांवर खेळत असताना मोहीत शर्माने एका बाऊंसरवर त्याला बाद केले. उमेश यादवने त्याचा झेल घेतला. त्यापाठोपाठ आंद्रे रसेलला जडेजाने बाद केले. रसेलनंतर शमीच्या गोलंदाजीवर सॅमी बाद झाला. त्यानंतर टेलरला यादवने तर होल्डरला जडेजाने बाद केले.
विंडिजला या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करायचा आहे. तर भारतालाही प्रथम स्थान आणि आत्मविश्वास कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे असेल.मोहम्मद शमी तंदुरुस्त झाल्याने भारताने भुवनेश्वर कुमारच्या जागी त्याला पुन्हा संघात स्थान देत एकमेव बदल केला आहे. तर वेस्ट इंडिजनेही सुलेमान बेन ऐवजी केमार रोचला संघात स्थान दिले आहे.