उत्तर प्रदेशीत माजी मंत्र्याच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यु

0
10

अलाहाबाद- उत्तर प्रदेशात होळीच्या उत्सवावर आज (शुक्रवारी) एका घटनेने विरजन पडले. उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील मुठ्ठीगंज भागात बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
राम चौरसिया (वय-22) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बहुजन समाज पक्षाचे (बसप) मंत्री नंदगोपाल नंदी यांच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला. यापूर्वी नंदगोपाल नंदी यांच्या घराबाहेर 2010 मध्ये अशाच प्रकारचा स्फोट झाला होता. यात एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराचा मृत्यु झाला होता. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे.लाहाबादचे एसएसपी दीपक कुमार यांनी सांगितले की, गावठी बॉम्बचा हा स्फोट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राम चौरसिया हा तरुण स्वत: बॉम्ब घेऊन जात असल्याचा संशय देखील पोलिसांनी वर्तवला आहे. राम चौरसियाच्या शरीराचे चिथडे-चिथडे उडाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.