ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला केले पराभूत

0
8

सिडनी – ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 377 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने केलेले प्रयत्न अखेर असफल ठरले. ऑस्ट्रेलियाने लंकेचे सर्व गडी 312 धावांमध्ये तंबूत परतवले आणि सामन्यावर आपले वर्चस्व गाजवले. श्रीलंकेचा डाव सर्व गडी बाद 312 धावांवर संपला.
सामन्याच्या सहाव्या षटकात दिलशान तिलकरत्नेने जॉन्सनला सहा चेंडूत सहा चौकार लगावत एकाच ओव्हरमध्ये 24 घेतल्या.
त्याआधी श्रीलंकेच्या डावाची सुरुवात झाली त्यावेळी गेल्या सामन्यात शतक करणाऱ्या थिरमानेला अवघ्या एका रनवर बाद करत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीची धार दाखवली. जॉन्सनने त्याला बाद केले. पण त्यानंतर आलेल्या संगकाराने दिलशानच्या मदतीने अत्यंत चांगली फलंदाजी केली. मोठे आव्हान पूर्ण करण्यासाठी आश्यक असलेली धावांची गती त्यांनी कामय ठेवली. सोबतच त्यांनी विकेटही राखली. दोघांनी अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. पण फॉकनरने दिलशानला बाद केल्यानंतर धावांची गती मंदावली. त्यानंतर आलेला जयवर्धनेनी एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. संगकाराने विश्वचषकात सलग तिसरे शतक साजरे केले. पण 104 धावांवर असताना तोही बाद झाला. त्यामुळे आता कर्णधार मॅथ्यूजवर विजय मिळवून देण्याची जबाबदारी आली आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या कांगारुंनी वॉर्नरलच्या रुपाने पाचव्या षटकात पहिला झटका बसला. मलिंगाने त्याला अघ्या 9 धावांवर बाद केले. त्यानंतर फिंचने काही चांगले फटके मारले पण तोही फार वेळ टिकला नाही. प्रसन्नाच्या एका चेंडूवर संगकाराने त्याची स्टम्पिंग केली. त्या दोघांनंतर मैदानावर आलेले स्मिथ आणि क्लार्क यांनी चांगली फलंदाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी त्या दोघांनी 134 धावांची भागीदारी केली. मलिंगाच्या गोलंदाजीवर क्लार्कचा त्रिफळा उडाला. तर त्यानंतर लगेचच पुढच्या षटकात स्मिथही बाद झाला. पण त्यानंतर मॅक्सवेलने एकच फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 51 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यानंतर फॉकनर पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला. मात्र मॅक्सवेलप्रमाणेच वॉटसननेही दुसऱ्या बाजुने फटकेबाजी केली. त्यानेही झटपट अर्धशतक पूर्ण केले. या सगळ्यांच्या धावांमुळेच ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली.

स्थान निश्चित होणार
ऑस्ट्रेलियाने श्रीलंतेच्या विरोधात नाणेफेक जिंकत आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेदरम्याचा हा सामना त्यांच्या गटातील संघांचे स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या सामन्याजिंकणारा संघ गटात दुसऱ्या स्थानावर असणार आहे. तसेच मोठ्या सामन्यांच्या पार्श्वूमीवर दोन्ही संघांना ताकद आजमावण्याची संधी मिळणार आहे.

1996 नंतर विश्वचषकात श्रीलंकेला ऑस्ट्रेलियावर विजय मिळाला नाही
श्रीलंकेने 1996 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर अातापर्यंत श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाचा पराभव करता आलेला नाही. सिडनीत हा सामना होत असून ऑस्ट्रेलियाने या मैदानावर अखेरच्या आठपैकी सहा सामने जिंकले आहेत.