ज्येष्ठ पत्रकार आणि आऊटलूकचे संपादक विनोद मेहता यांचे निधन

0
7

नवी दिल्ली – ‘आऊटलूक’ ग्रुपचे संस्थापक, संपादक विनोद मेहता यांचे आज (ता.8) हृदय विकारच्या तीव्र झटक्याने दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. मेहता हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक मतांसाठी ओळखले जात होते.
भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये विनोद मेहता यांचे नाव आदराने घेतले जाते. तसेच देशातील वरिष्ठ पत्रकारांमध्ये देखील त्यांचा समावेश होतो. मेहता यांनी त्यांच्या करिअरच्या सुरवातीच्या काळात ‘सण्डे ऑब्जर्व्हर’, ‘द पायनिअर’ आणि ‘आऊटलूक’ यांसारख्या मासिकांमध्ये काम केले. तसेच त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. विशेष म्हणजे मेहतांच्या कुत्र्याचे नावही देखील ‘एडिटर’ असे होते.