अटल मॅराथॉन स्पर्धेत धावले शेकडो युवक-युवती

0
18
गोंदिया,दिय26ःःभारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे ११ किमी अंतराची मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन २५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता शहरात मुर्री चौकी ते कालेखॉ चौक मार्गावर करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींनी कडाक्याच्या थंडीतही उत्साहात सहभाग घेतला.
भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आ. डॉ. परिणय फुके यांनी भाजपाची झेंडी दाखवून मॅराथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला. तर सकाळी ९ वाजता स्पर्धेचे विजेत्या धावकांना भाजपा पोरितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हेंमत पटले, आ. डॉ. परिणय फुके,नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा-गोंदिया लोकसभा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,शिव शर्मा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, शहर अध्यक्ष सुनिल केलनका,घनशाम पानतावने, भरत क्षत्रीय, कशिश जायस्वाल, नंदकुमार बिसेन, प्रदिपqसग ठाकूर, दीपक कदम, संजय कुळकर्णी, नगरसेवक राजकुमार कुथे, वर्षा खरोले, अफसाना पठाण, विवेक मिश्रा अभय सावंत आदींच्या उपस्थितीत विजेत्या धावकांना पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रास्ताविक ॠषीकांत शाहू यांनी केले.
स्पर्धेच्या युवक गटात प्रथम पुरस्कार सुभाष लिल्हारे, व्दितीय गुरुदेव दमाहे, तृतीय आशिष नागपुरे तसेच चतुर्थ व दहा क्रमांकामध्ये अनुक्रमे देवेंद्र चिखलोंडे, विजय पंधराम, आकाश भोयर, गणेश शेंडे, संदिप चौधरी, उमेश भांडारकर, महेंद्र मुरकुटे तर युवतींच्या गटात प्रथम पुरस्कार पुजा बिसेन, व्दितीय स्वाती पाचे, तृतीय विशाखा पागोटे, चतुर्थ रिया तुप्पट तर दहा क्रमांकामध्ये अनुक्रमे डिलेश्वरी कटरे, सीमा टेंभरे, संतोष लिल्हारे, सविता नागपुरे, ज्योती नागपुरे, सोनल ताखंडे यांनी पटकाविला. विशेष म्हणजे या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकावर येणारी रिया तुप्पट हि १० वर्षाची असून पायात काहीही न घालता धावत विजयी झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिचे कौतूक करत तिला पुरस्कार दिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी  स्पर्धेचे संयोजक बंटी पंचबुध्दे, सुधीर कायरकर, हंसू वासनिक, दारा बैरीसाल, राजू पटले, पंकज सोनवाने, अभय मानकर, रोहीत अग्रवाल, अजीत टेंभरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अनुराग शुक्ला यांनी केले. तर आभार राहूल यादव यांनी मानले.