जिल्हा काँग्रेस कमिटीची निर्दशने;राफेल घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

0
14

भंडारा,दि.26ः-राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व निर्दशने करीत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधांना निवेदन पाठविण्यात आले.
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा राफेल लढाऊ विमान घोटाळा करण्यात आला. राफेल विमान खरेदी घोटाळयामुळे सरकारी खजिना ४१,२0५ कोटी रूपयांनी झाला. ज्या विमानांची किंमत ५२६.१0 कोटी रुपये होती ते विमान भाजप सरकार ने १६७0.७0 करोड रूपयांनी खरेदी करण्यात आले. हिंदुस्थान एयरोनाटिक्स लिमिटेड या पब्लिक सेक्टर कंपनीला ठेका न देता १२ दिवस जुनी एका खाजगी कंपनीला सदर कंत्राट देण्यात आले. देशाला आवश्यक १२६ विमान कमी करून केवळ ३६ विमानांचा सौदा करण्यात आला. अशाप्रकारे देश हित, देशाची सुरक्षेच्या सबंधी भाजपा प्रणित सरकारने महाघोटाळा केला. या राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळयाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात येवून दोषींवर त्वरीत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ.आनंदराव वंजारी, जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रदेश महासचीव जिया पटेल, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, महिला अध्यक्ष सिमा भुरे, जि.प. सभापती प्रेम वनवे, भंडारा तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, लाखांदूर तालुका अध्यक्ष भुमेश्‍वर महावाडे, तुमसर तालुकाध्यक्ष शंकर राऊत, साकोली तालुकाध्यक्ष नंदू समरीत, तुमसर शहराध्यक्ष अमर रगडे, भंडारा शहर अध्यक्ष सचिन घनमारे, सेवादल अध्यक्ष कैलाश भगत, विकास राऊत, सभापती निलकंठ टेकाम, अनीक जमा, आवेश पटेल, गिता बोकडे, सुनील गिर्‍हेपुंजे, न.प. सदस्य शमिम शेख, जयश्री बोरकर, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, माजी सभापती हंसा खोब्रागडे, जि.प. सदस्य मंदा गणवीर, जि.प. सदस्य दिपक मेंढे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.