पाकचे जहीर अब्बास आयसीसीचे नवे अध्यक्ष

0
18

पीटीआय
बार्बाडोस दि. २५: – पाकिस्तानचे माजी कर्णधार जहीर अब्बास यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे आज (गुरुवारी) हाती घेतली.आयसीसीच्या वार्षिक परिषदेच्या तिसऱ्या दिवशी अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आल्यानंतर जहीर अब्बास यांचा एक वर्षाचा कार्यकाल सुरू झाला. म्हणाले, ‘आपल्या महान खेळाच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याने माझा खरोखर सन्मान झाला आहे, याचा मी नम्रपणे स्वीकार करतो.‘‘हा असा खेळ ज्यामुळे आपल्याला मैत्री, आदर, ओळख आणि आपल्या देशांची विविध क्षमतांनुसार सेवा करण्याची संधी मिळाली. वैयक्तिक जीवनातही मी जे कधीही परत करू शकणार नाही असे मला या खेळाने दिलेले आहे,‘ अशा शब्दांत अब्बास यांनी भावना व्यक्त केल्या