मोदी-फडणवीसांची दिल्लीत भेट

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. २५:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी 1 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 रेसकोर्स या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी फडणवीस आणि मोदी यांच्यात राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचे समजते आहे. दरम्यान, फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना नाशिकमध्ये होणा-या आगामी महाकुंभ मेळाव्याचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांच्यासमवेत महाकुंभमंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, कामगारमंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत शहर विकासाशी संबंधित तीन मुख्य योजनांचे उद्घाटन केले. यात 100 स्मार्ट सिटी बनवणे, 500 शहरांमध्ये अटल शहर पुनरुज्जीवन-परिवर्तन मिशन आणि 2022 पर्यंत शहरी भागांमध्ये सर्वांना घरे उपलब्ध करून देणे या योजनांचा समावेश आहे. या उद्घाटन समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री व नाशिक येथे होणा-या कुंभ मेळाव्याचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. सकाळी 11 वाजता या योजनांचे अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर 1 च्या सुमारास मोदी-फडणवीस यांच्यात चर्चा झाली.
या भेटीत फडणवीस यांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबत पंतप्रधानांना माहिती दिल्याचे समजते आहे. पुढील पंधरवड्यात राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा फडणवीस यांचा मानस आहे. त्याबाबत फडणवीस मोदींशी चर्चा करणार असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. याचबरोबर मागील काही दिवसात राज्य सरकारमधील मंत्र्यांबाबत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची माहिती फडणवीसांनी मोदींना अवगत केल्याचे कळते आहे. यात पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर यांच्या पदवीच्या घोळासह दोन पत्नींवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांची माहिती दिली. याचबरोबर विनोद तावडेंच्या ज्ञानेश्वर विद्यापीठातील अनिधकृत पदवी, पंकजा मुंडेंवर बुधवारीच झालेल्या 206 कोटींच्या गैरव्यवहाराबाबत फडणवीसांनी मोदींना माहिती दिल्याचे कळते