दिपेश सोनेवानेला मिळाले,इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे अवॉर्ड

0
288

गोंदिया,दि.04ः भारतात काही विशेष कार्य करणाऱ्या लोकांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद घेतली जाते. व त्यांचा अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात येतो.स्थानिक शास्त्री वॉर्ड निवासी दिपेश महेंद्र सोनेवाने यांच्या पेन्सिल लीड मायक्रो आर्टची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. दिपेश सोनेवानेने जगातील सात आश्चर्य असणाऱ्या वास्तूंना एका पेन्सिलच्या लीडवर कोरीव काम करून सुंदर अशी कलाकृती निर्माण केली.त्यात ताजमहाल, पेट्रासिटी, ग्रेट वॉल ऑफ चायना, रिवोदि जानेरो, चीचन इटजा, कोलोझीअम, मच्चू पिच्चू यांचा समावेश आहे.
या मायक्रो आर्टची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली व दिपेशला प्रशस्तीपत्र, मँडल, बॅच देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्यामुळे त्यांच्या सोबत गोंदियाचे नाव सुद्धा इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये समाविष्ट झाले आहे.
दिपेश सोनेवाने यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे रतिराम भांडारकर, जयेश मुरकुटे, महेन्द्र सोनेवाने, सौ.यशोधरा सोनेवाने, सौ.अनिता मुरकुटे, स्नेहल सोनेवाने, श्रुती सोनेवाने, जयंत मुरकुटे, डॉ.मंगेष सोनेवाने, श्रीकांत चुटे, संजय आसटकर यांनी अभिनंदन केले.