सांगली जिल्ह्यातील प्रेरणादायी उपक्रम
संख: जत तालुक्यातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेने परिसर व मायाक्का देवस्थानाच्या जागेवर १ हजार ५० वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबिवला आहे.पर्यावरण समृद्धीचा संदेश दिला आहे.
पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद शाळा द्विशिक्षकी आहे.आय.एस.ओ. मांनाकीत शाळा आहे.विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना सोबतच जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले आहेत. यातूनच विद्यार्थी स्वतःच्या परिसरातील समस्यांचे निराकरण ,पर्यावरणासंदर्भात स्वतःची जबाबदारी, चिकित्सक विचार करण्यास शिकतात.
शिक्षक दिलीप मारोती वाघमारे यांचे मूळ गाव बोळेगाव (ता.बिलोली, जि.नांदेड) आहे.मुलांना शाळेत नियमित हजेरी लावण्यासाठी प्रोत्साहित केले.वेगवेगळे उपक्रम राबिवले.पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती व शैक्षणिक गुणवत्ता विषयी अनोखा उपक्रम राबिवला.
वृक्षारोपण व संवर्धन उपक्रम अंतर्गत शाळा परिसर, मायाक्का देवस्थान जागेवर व शेतकऱ्यांच्या बांधावर १ हजार ५० झाडांची लागवड केली आहे.मायाक्का देवस्थानाच्या एकर जागेवर ७०० झाडे व शाळेच्या आवारात ३५० झाडे लावली आहेत.यामध्ये
कडुलिंब,बहावा,चिंच,पिंपळ,वड,कवठ,महारुख,काशीद,बेल,अजीर,रिठा,पिंपरण,आपटा,चिक्कू,आंबा,अशोक,संकेश्वर,आवळा,सिताफळ,सप्तपर्णी,पायर ही झाडे लावली आहेत.
प्रत्येक विद्यार्थीना घरी ४ झाडें दिली आहेत.विद्यार्थी व पालकांना वृक्षाचे महत्व पटवून देऊन त्यांना प्रोत्साहित केले.संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून झाडे लावली आहेत.
सध्या शाळेला उन्हाळी सुट्टी आहे सकाळी ६ते ८ वाजेपर्यंत सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी शिक्षक दिलीप वाघमारे, अनिल पवार,पालक निंगाप्पा वज्रेशट्टी,राजू गडदे-मिस्त्री,गुलाब गडदे,प्रकाश बाबर,आप्पासो गडदे, दत्तात्रय कोरे, दत्तात्रय बाबर,तानाजी कोकरे, राहुल गडदे, आकाश गडदे शाळेतील सर्व विद्यार्थी पाणी पाजतात. झाडांची जोपासना करतात.
झाडांना राजाराम केरुबा गडदे या शेतकऱ्यांनी शाळेसाठी पाणी दिले आहे. सयाप्पा मोटे-पुजारी, गुलाब गडदे,तुकाराम बाबर यांनी वृक्ष संवर्धनसाठी मदत करतात.शिक्षक दिलीप वाघमारे दरवर्षी वृक्ष संवर्धनासाठी उन्हाळी सुट्टीत गावी जात नाहीत.फक्त आठ ते नऊ दिवसाची सुट्टी घेतात.
पर्यावरण उपक्रमाला सह्याद्री देवराईचे सयाजी शिंदे विशेष मार्गदर्शन मिळतो,जालिहाळ बुद्रुक (ता.जत) येथील येराळा प्रोजेक्ट्स सोसायटीचे प्रमुख नारायण देशपांडे,सचिन मिरजकर यांनी सहकार्य केले. रोपे, जाळी, बांबू,ड्रिप,पाईप पुरविली आहेत.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण प्रजन्यमान भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. त्यावर प्रभावीपणे मात करण्याची करायची असल्यास काळाची गरज ओळखून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे
दिलीप वाघमारे मुख्याध्यापक बाबरवस्ती