जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंबाझरी परिक्रमा उपक्रम

0
15

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या
क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूर व महाराष्ट्र टाईम्सचा संयुक्त उपक्रम

नागपूर, दि. 4 – पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूर आणि दैनिक महाराष्ट्र टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ५ जून २०२२ रोजी सकाळी ५.३० वाजता अंबाझरी तलाव परिसरात अंबाझरी परिक्रमा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात नाव नोंदणी अभियानाद्वारे नागपूरकर पर्यावरण प्रेमी सहभागी झाले आहेत. या उपक्रमात अंबाझरी तलावाजवळील विवेकानंद स्मारकापासून सुरू होणाऱ्या या परिक्रमेचा थरार अनुभवता येणार आहे.
नागपूर शहराची शान वाढिवणारे जेही महत्त्वाचे घटक आहेत, यापैकी एक म्हणजे अंबाझरी तलाव. हा देखणा तलाव आपण एरवी येता-जाता बघतो. मात्र, तलावाच्या आजूबाजूला असलेले निसर्गसौंदर्य अनुभवण्याची संधी या परिक्रमेतून मिळणार आहे. ही परिक्रमा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूर आणि महाराष्ट्र टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

नोंदणी केलेल्या पर्यावरण प्रेमींसाठी सूचना
परिक्रमेला येताना हे करा
– जवळ पुरेसे पाणी ठेवा
– मोठा रुमाल, ग्लुकोज, आवश्यक असल्यास औषधे सोबत असू द्या
– स्पोर्टस शूज, गॉगल, टोपीचाही वापर करा
– सैल कपडे घाला
– परिसरात गवत असल्याने शॉर्टस्ऐवजी ट्राऊझर्स किंवा लोअर घाला