संतोष पारधी यांनी केली सेंद्रीय शेतीतून उन्नती

0
39

संतोष हिरदीलाल पारधी हे धामणगाव, ता.आमगाव, जि.गोंदिया येथील रहिवासी असून सन 2005 पासून सेंद्रीय शेती करीत आहेत व त्यांना त्याचा महत्व पटला असून ते गावातील इतर शेतकऱ्यांना सुध्दा त्याबाबत नेहमी मार्गदर्शन करीत आसतात. सन 2017 मध्ये आत्मा अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेती गट स्थापन करण्याकरीता त्यांनी आपल्या गावातील 50 शेतकऱ्यांना एकत्र करुन त्यांची सभा आयोजित करुन चर्चेद्वारे त्यांचे सेंद्रीय शेती विषयक दृष्टीकोन सकारात्मक करण्यात यश मिळविले व तेव्हापासून गावात सेंद्रीय शेती गटाची स्थापना करण्यात आली. त्यांची सेंद्रीय शेती गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

        गावातील शेतकरी रासायनिक पध्दतीनेच भाताची शेती करीत होते परंतू त्यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आपल्या शेतात यशस्वी सेंद्रीय शेती करुन दाखविले व हळूहळू सर्व शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले. गावात वेळोवेळी सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम होत होते, त्यामध्ये हे नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे. गटातील 50 शेतकरी सेंद्रीय पध्दतीने शेती करायला सुरुवात केलीच परंतू इतरही शेतकऱ्यांनी यांना पाहून सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली व आता संपूर्ण धामणगाव सेंद्रीय शेती करीत आहे. जे शेतकरी स्वत: सेंद्रीय औषधी तयार करु शकत नाही त्यांना हे आपल्या घरी तयार केलेली औषधी पुरवीत असतात.

        संतोष पारधी यांनी सेंद्रीय शेती करण्याकरीता स्वत: घरी गांडूळ खत युनिटची उभारणी केली. नाडेप कंपोस्ट खत युनिट तयार केले. घनजिवामृत, जिवामृत, बिजामृत तयार करुन जमीन सुधारणेचा काम करतात. तसेच पिकाचे किड व रोगापासून बचाव करण्याकरीता दशपर्णीअर्क, अग्निस्त्र, ब्रम्हास्त्र, निमार्क, निंमऑईन, निंबोळी अर्क इत्यादीपासून बनविलेले औषधीचा वापर करतात. तसेच ॲझेटोबॅक्टर, रायझोबियम, पिएसबी, मॅटेरायझिम इत्यादी बुरसीव जिवाणुजन्य औषधींचा वापर आपल्या शेतात करीत असतात व त्यांचे अनुकरण गावातील इतर शेतकरी सुध्दा करीत आहेत.

       शेतकऱ्यांनी सेंद्रीय पध्दतीने लागवड करुन किफायतशीर व व्यवसायिक शेती कशी करावी यांचे ते एक कृतिशील उदाहरण आहे. त्यांची जिद्द व कृतिशिल विचाराने धानाचे सेंद्रीय पध्दतीने लागवडीचे क्षेत्र वाढविण्यात त्यांचे शेतकऱ्यांना मोलाचे सहकार्य आहे. आता त्या गावात व परिसरात 300.00 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय पध्दतीने धानाची लागवड होत आहे व रासायनिक खते व औषधीवर लागणारे तब्बल 2 लाख रुपयाचे शेतकऱ्यांची बचत झालेली आहे. कृषि विभाग शेतकऱ्यांचे सेवार्थ हे कृषि विभागाचे ब्रिदवाक्य त्या गावात व परिसरातील क्षेत्रात यशस्वी होण्यास त्यांचे श्रम मोलाचे ठरले आहे.

संतोष पारधी यांनी केली सेंद्रीय शेतीतून उन्नती

       श्री संतोष हिरदीलाल पारधी हे धामणगाव, ता.आमगाव, जि.गोंदिया येथील रहिवासी असून सन 2005 पासून सेंद्रीय शेती करीत आहेत व त्यांना त्याचा महत्व पटला असून ते गावातील इतर शेतकऱ्यांना सुध्दा त्याबाबत नेहमी मार्गदर्शन करीत आसतात. सन 2017 मध्ये आत्मा अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेती गट स्थापन करण्याकरीता त्यांनी आपल्या गावातील 50 शेतकऱ्यांना एकत्र करुन त्यांची सभा आयोजित करुन चर्चेद्वारे त्यांचे सेंद्रीय शेती विषयक दृष्टीकोन सकारात्मक करण्यात यश मिळविले व तेव्हापासून गावात सेंद्रीय शेती गटाची स्थापना करण्यात आली. त्यांची सेंद्रीय शेती गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली.