कोसमी-किसनेली जंगल परिसरात ५ नक्षल ठार

0
594
file photo

गडचिरोली,दि.18ः- जिल्ह्यातील धानोर पोलीस उपविभागातंर्गंत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात आज सायकांळी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या पोलीस -नक्षल चकमकीत 5 नक्षली ठार झाल्याची माहिती पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी ६० चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.प्रत्युत्तरादाखल सी ६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.यामध्ये ५ नक्षलवाद्यांना( 2पुरुष व 3 महिला) ठार करण्यात सी ६० जवानांना यश आले.घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.