गोंदिया 130 कोरोना बाधित रुग्ण,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.59 टक्के

0
664

गोंदिया,दि.18 ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या आज 18 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालातून जिल्ह्यात आणखी 130 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. उपचार घेत असलेल्या 49 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य तपासणीला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली.उपचारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.59 टक्के आहे.तर बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.27 टक्के इतका आहे.

आज आणखी 130 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -71, तिरोडा तालुका -17 , गोरेगाव तालुका-01,आमगाव तालुका-17, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका- 14, सडक/अर्जुनी तालुका -03, अर्जुनी/मोरगाव-07 रुग्ण आढळून आले आहे.

कोरोना बाधित आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -5000, तिरोडा तालुका -1105, गोरेगाव तालका -359,आमगाव तालुका -589,सालेकसा तालुका -368, देवरी तालुका-376, सडक/अर्जुनी तालुका-360,अर्जुनी/मोरगाव तालुका-384 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 95 रुग्ण आहे.असे एकूण 8639 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

49 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-24, तिरोडा तालुका-04, गोरेगाव तालुका-00, आमगाव तालुका -06, सालेकसा तालुका-01, देवरी तालुका-06, सडक/अर्जुनी तालुका – 07 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-01असा आहे.

जिल्ह्यातील 7598 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -4432 तिरोडा तालुका- 999, गोरेगाव तालुका-322,आमगाव तालुका-507,सालेकसा तालुका- 354, देवरी तालुका-310,सडक/अर्जुनी तालुका-297, अर्जुनी/मोरगाव तालुका-297 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.

क्रियाशील कोरोना रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -502,तिरोडा तालुका-90, गोरेगाव तालुका- 33,आमगाव तालुका-76, सालेकसा तालुका -12, देवरी तालुका-64, सडक/अर्जुनी तालुका- 63,अर्जुनी/मोरगाव तालुका-85 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 05 असे एकूण 930 रुग्ण कोरोना क्रियाशील आहे.

जिल्ह्यात क्रीयाशील असलेल्या रूग्णांपैकी 437 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-226, तिरोडा तालुका-35, गोरेगाव तालुका -12,आमगाव तालुका -35 , सालेकसा तालुका-10,देवरी तालुका -51,सडक/अर्जुनी तालुका-32,
अर्जुनी/मोरगाव तालुका-36 रुग्ण आहेत.

कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 87.59 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.27 टक्के असा आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 111 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-66, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका-6, सालेकसा तालुका-2 देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -2 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 35357 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 26875 नमुने निगेटिव्ह आले. तर 5447 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 174 नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

गृह विलगिकरणात 158 आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 31000 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 27883 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3117 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 21 चमू आणि 17 सुपरवायझर 17 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-02,आमगाव तालुका-00 सालेकसा तालुका-00, देवरी तालुका -03, सडक/अर्जुनी तालुका-01, गोरेगाव तालुका-02, तिरोडा तालुका -09 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -00 असे एकूण 17 कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.

गोंदिया येथे कोरोना वॉर रूम तयार करण्यात आली आहे.या वॉर रूममधून रुग्णांना 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे.रूग्णांना काही समस्या असल्यास 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात.त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक.9823254920 आणि 9765090777 यावर संपर्क साधावा.