ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा

0
23
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर- केंद्रात आणि राज्यात ओबीसी विकास मंत्रालयाची स्थापना, अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेल्या कलम ३४० प्रमाणे ओबीसींची स्वतंत्र सूची, ओबीसींच्या लोकसंख्येच्या तुलनेत अर्थसंकल्पात तरतूद आणि ओबीसींची जनगणना, या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा सर्वच
पातळ्यांवर लढा पुकारण्यात येईल, असा इशारा ओबीसी संघटनांच्या गोलमेज परिषदेतून रविवारी देण्यात आला.तसेच राज्यातील खासदार,आमदार यांच्यासह स्थानिक पातळीवर या परिषदेत तयार करण्यात आलेला मसुदा देऊन शासन दरबारी लावून धरण्यासाठी त्यांच्यावर दबावतंत्रासोबतच नागपूर येथे सुरु होणार्या अधिवेशनाच्या पहिल्याच
दिवशी ओबीसींच्या मुद्यावर राज्यातील शाळा महाविद्यालय बंद करण्याबाबतचा विचार करण्यात आला.

ओबीसी गोलमेज परिषदेतील सूर

ओबीसींच्या विदर्भातील विविध संघटनांनी एकत्र येत ओबीसींची गोलमेज परिषद धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये आयोजित केली. आंदोलक, कार्यकर्ते, विचारवंत, नेते, कर्मचारी, विद्यार्थी आदी मान्यवर यात सहभागी झाले. सर्वच संघटनांचे एकमत असलेला ओबीसी प्रश्नांवरील अजेंडा या परिषदेतून तयार करण्यात आला. ओबीसींच्या लढ्यासाठी संयुक्त
कृती समितीही स्थापन करण्यात आली. महात्मा फुले समता परिषदेचे प्रा. दिवाकर गमे, ओबीसी मुक्ती मोर्चाचे नितीन चौधरी, ओबीसी संघर्ष समितीचे शेषराव येलेकर,
ओबीसी कृती समितीचे सचिन राजूरकर, ओबीसी एकता मंचचे सुनील पाल, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे,गोदिया जिल्हा ओबीसी कृती समितीचे सदस्य व बेरार टाईम्सचे संपादक खेंद्र कटरे,युवा भोयर पवार मंचचे मनोज चव्हाण,उषाकिरण थुटे आदी प्रमुख मान्यवरांनी संबोधित केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे भरतीप्रक्रियेबाबतचे अन्यायकारक घोषणापत्र मागे घ्यावे, नोकरीतील अनुशेष त्वरित भरण्यात यावा, पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे,
आदिवासी जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण वाढवावे, पेसा कायदा रद्द करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. पुढील काळात जिल्ह्यासह तालुकापातळीवर आंदोलने उभारली पाहिजे. प्रश्?नांवर अभ्यासासाठी गट तयार केले पाहिजे. ओबीसी जनगणना करण्यास बाध्य करण्यासाठी मोठी आंदोलने उभारली पाहिजे, असे मतही व्यक्त करण्यात आले.
परिषदेचे आयोजन महात्मा समता परिषदेचे प्रा.दिवाकर गमे,अ‍ॅड.बाबुराव बेलसरे,पत्रकार प्रमोद काळबांडे यांनी केले होते.या परिषदेला जयंत मानकर,केशव तितरे,दिनानाथ
वाघमारे,मुकुंद अडेवार,दादाजी चाफले,पांडुरंग नागपूरे,रामदास निमरळ,योगेशर करोले,देवीदास गावंडे,धन्नालाल नागरीकर,अनिल डोंगरवार,संदिप भारंबे,गुणवंत देशमुख,बबनराव फंड,हिराचंद बोरकुटे,अेिशनी सुयर्वंशी,अविनाश पाल,प्रियंका गुडधे,अेिशनी राऊत,गोविंदराव भेंडे,वसंतराव ढगे,प्रदिप वादाफळे,यशवंत फुंडे,धमार्दास रेवतकर,गणेश भोयर,कृष्णा देवासे,मुकुंद पंडागळे,अरुण शहारे,श्रावण खरकाटे,दिलीप चवखळे,प्रदिप महल्ले,शिरीष बुचे यांच्यासह महात्मा फुले समता परिषद,
ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी कृती समिती, ओबीसी आरक्षण हक्क समिती, ओबीसी कर्मचारी असोसिएशन, संघर्ष वाहिनी, युवा भोयर पवार मंच, आरओबीसी,
शिक्षक भरती संघटना, अखिल भारतीय कुणबी, ओबीसी मराठा सेवा संघ, ओबीसी सेवा संघ, बामसेफ, ओबीसी महाराष्ट्र संघर्ष समिती, आयटीआय निदेशक
संघटना, एलआयसी ओबीसी कर्मचारी वेलफेयर असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.