श्रीनगर, दि. ११ – जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा यंत्रणा व दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे.
हंदवाडा येथील लारीबल गावातील घनदाट जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी जंगलात शोधमोहीम सुरु केली होती. या मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. यात दोन जवान शहीद झाले तर जवानांनी गोळीबारात दोघा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. आणखी काही दहशतवादी जंगलात लपून बसले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.