बाघनदी पात्रात बुडालेल्या चौघांंचे मृतदेह मिळाले

0
416

गोंदिया,दि.08ः आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील वाघ नदीपात्रात चार युवक वाहून गेल्याची घटना मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. बाघ नदीमध्ये बुडालेल्या संतोष अशोक बहेकार (19), रोहित नंदकिशोर बहेकार (18) मयूर अशोक खोब्रागडे (21), सुमित दिलीप शेंडे (16) सर्व रा. कालीमाटी ता. आमगाव चारही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.आज बुधवारला सकाळी शोधपथकाने काम सुरु करताच घटनास्थळापासून 50 मीटर अंतरावर पहिला मृतदेह,100 मीटरवर दुसरा आणि 200 मीटरवर तिसरा व चौथा मृतदेह हाती लागला. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वात आपत्ती निवारण पथकाच्या चमूने सदर शोधमोहीम राबवली.आमगावचे तहसीलदार आमगांव दयाराम भोयर, सहा.पो.नि.नाले, शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उके, राजकुमार खोटेले, राजकुमार बोपचे, जसवंत रहांगडाले, रवि भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, राज अंबादे, सुरेश पटले, चालक- मंगेश डोये, इंद्रकुमार बिसेन चुंन्नीलाल मुटकुरे, जबराम चीफ चिखलोंडे, गिरधारी पतैह, चिंतामण गिरहेपुंजे आदीनी शोध कामात सहकार्य केले.