रुपेशकुमार राऊत जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर रुजू

0
217

गोंदिया,दि.8 : रुपेशकुमार राऊत हे 7 सप्टेंबर रोजी जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर रुजू झाले आहेत. श्री
राऊत यांचे शिक्षण एम.एस.सी. (भौतिकशास्त्र), एम.एड., एम.बी.ए. (फायनान्स), एम.ए. (अर्थशास्त्र), याशिवाय
बॅचलर ऑफ जर्नालिझम तसेच भौतिकशास्त्रात सेट, मॅनेजमेन्टमध्ये नेट, शिक्षणशास्त्रात नेट व अर्थशास्त्रात नेट उत्तीर्ण
केलेले आहे. अर्थशास्त्रात पी.एच.डी.सुरु आहे. इंटरनॅशनल जर्नलमध्ये आतापर्यंत पाच रिसर्च पेपर प्रकाशित झाले
आहे. निराली प्रकाशन पुणे येथून राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी एका पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
सन 2019 पूर्वी शासकीय सेवेत दाखल होण्याआधी शिक्षण क्षेत्रात कार्यरत. अनेक वर्षे सी.बी.एस.ई. शाळेत,
पदवी महाविद्यालयात, पदव्युत्तर महाविद्यालयात तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर
भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन. 2016 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत सी.बी.एस.ई. शाळेत प्राचार्य म्हणून कार्य.
14 फेब्रुवारी 2019 ते 6 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर येथे सहाय्यक जिल्हा नियोजन
अधिकारी म्हणून कार्यरत. 7 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
अर्थशास्त्रात संशोधनाची आवड असल्याने सांख्यिकी विभागाला निश्चितच लाभ होणार आहे.