केंद्रीय मंत्र्यांची पत्नी नीलम राणे,मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआऊट नोटीस

0
124

पुणे– पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. DHFL कडून घेतलेले कर्ज न भरल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने 25 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज कंपनीच्या सह-अर्जदार आहेत. 25 कोटींचे हे कर्ज न भरल्याबद्दल लुकआउट परिपत्रक जारी केले. डीएचएफएल कंपनीने तक्रार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आम्हाला केंद्राकडून कारवाईसाठी पत्र – गृहमंत्री पाटील
या प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गृह विभागाला या संदर्भात केंद्र सरकारचे पत्र प्राप्त झाले आहे. आम्ही ते पुणे पोलिसांना दिले आहे आणि त्यानुसार आम्ही लुकआउट परिपत्रक जारी केली आहे.

सरकारची सूड घेण्याच्या भावनेने कारवाई – भाजप
या कारवाईवर भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले, ‘मला सध्या याबद्दल काहीच माहिती नाही. पण जर नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असेल तर राज्य सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत आहे. ज्या बेकायदेशीर मार्गाने नारायण राणे यांना अटक करण्यात आली. राज्य सरकारची ही पुढची पायरी आहे.