जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवून संकटमुक्त करा

0
33
– जिल्हा भाजपाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गोंदिया, 9 सप्टेंबर –जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचे विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा, आदी मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पक्ष गोंदिया जिल्हा किसान आघाडी तर्फे आज, 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
निवेेदनानुसार, ई-पीक नोंदणी अ‍ॅपची क्लिष्ट अट तत्काळ रद्द करावी, खरीप हंगामातील पावसाअभावी रोेवणी न झालेल्या शेतीचा पंचनामा करुन शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, गादमाशीचा प्रादुर्भाव झालेल्या धान पिकाची पाहणी करुन नुुकसान भरपाई देण्यात यावी, जिल्ह्यात सरासरीपेक्षा 40 टक्के पाऊस कमी पडल्यामुळे धान पिकाची लावलेली रोपे गंभीर अवस्थेत असून 50 टक्क्यापेक्षा कमी उत्पादन होणार आहे. त्याचे पंचनामे करुन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा, धडक सिंचन विहिर योजनेचे प्रलंबित चुकारे शेतकर्‍यांना तातडीने  द्यावे, युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. त्यावर कारवाई करण्यात यावी व युरिया उपलब्ध करण्यात यावा, कृषी पंपाना 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, थकीत कृषी पंपाची विद्युत जोडणी धान पिक परिवक्व होईपर्यंत कापण्यात येऊ नये, थकीत कृषी पंपाचे विद्युत बील माफ करावे, रानडुक्कराच्या हैदोसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, आदी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, आ. विजय रहांगडाले, माजी आ. हेमंत पटले, माजी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.खोमेश रहांगडाले, माजी आ.रमेश कुथे, माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष संजय टेंभरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भावना कदम, आदीवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हनवत वट्टी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, गोंदिया मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, तिरोडा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाने, गोरेगाव तालुका अध्यक्ष साहेबलाल कटरे, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अशोक लंजे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, पंकज रहांगडाले, किसान आघाडी महामंत्री अशोक हरिणखेडे, चतुर्भूज बिसेन, खेमराज लिल्हारे, राजेश कापगते, गजेंद्र फुंडे, देवचंद नागपुरे, अर्जुन नागपुरे, बबली ठाकूर, सुधीर ब्राम्हणकर, अरुण दुबे, शालिनी डोंगरे, बबली ठाकूर, कैलास गौतम, रतनलाल बघेले, देवलाल पटले, यवकराम रहांगडाले, कुवरलाल येळे, अरुण काळसर्पे, जागेश्वर पटोले, प्रह्लाद कोरे, सुरेंद्र दमाहे, टेकचंद बलभद्रे, जागीन्द्रनाथ पारधी, गुलाम दस्तगीर पठाण, नुरनाथ दिहारी, सुभाष बागडे, मुकेश कटरे, आत्माराम दसरे, वजीर बिसेन, कुवरलाल ठाकरे, नितीन पारधी, रजनीश बोपचे, रुपाली टेम्भूर्णे, शैलेश तुरकर, खुशाल काशिवार, प्रभुलाल शरणागत, राजकुमार गणवीर, महेंद्र कटरे, उमेश पारधी, मनोहर बुद्धे, विनोद ठाकरे, संदीप बिसेन, संजीव बागडे, सोमेश्वर तुरकर, शिवराम नागपुरे, मोरेश्वर लांजेवार, शंभूशरण ठाकूर, सुभाष साठवणे, राधेश्याम सोनवाने, जागेश्वर दसरीया, हुकूमचंद बोपचे, लक्ष्मण चुटे, जीवन चौव्हाण, प्रेमेंद्र तुरकर, रामकृष्ण मरस्कोल्हे, आदित्य उके, मुन्ना तुरकर, हिरालाल टेंभरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.