काळ्या पैशासंदर्भातील काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळला

0
10

काळ्या पैशासंदर्भात काँग्रेसने सादर केलेला स्थगन प्रस्ताव बुधवारी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावला.
नवी दिल्ली – काळ्या पैशासंदर्भात काँग्रेसने सादर केलेला स्थगन प्रस्ताव बुधवारी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावला.
काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, एम.वीरप्पा मोईली आणि कमल नाथ यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्तेत आल्यानंतर १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा परत आणू असे आश्वासन दिले होते. मात्र भाजप हे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे या मुद्दयावर चर्चा केली जावी यासाठी काँग्रेसने हा प्रस्ताव मांडला होता.
काँग्रेसने सादर केलेला स्थगन प्रस्ताव नियम ५६च्या अंतर्गत असणा-या निकषांमध्ये बसत नसल्याने तो फेटाळून लावल्याचे महाजन यांनी लोकसभेत सांगितले.