पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या महिलेकडून “कॉन्स्टेबल” मसाज करून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल!

0
48

पाटणा, वृत्तसेवा : 29 एप्रिल 2022 : बिहार पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नितीश कुमार यांच्या सरकारला महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत लोक प्रश्न विचारत आहेत.बिहारच्या सहरसा येथील नौहट्टा पोलीस स्टेशनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेकडून मसाज करून घेताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एसएचओ शशी भूषण सिन्हा महिलेकडून तेलाची मालिश करून घेताना दिसत आहे. तर त्याच्या शेजारी आणखी एक महिला खुर्चीवर बसलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी फोनवर वकिलाशी बोलतानाही ऐकू येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मसाज करणारी महिला आपल्या मुलाला तुरुंगातून सोडवण्यासाठी आली होती. त्यानंतर एसएचओने मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्याचं आश्वासन देऊन महिलेला तेलाची मालिश करून देण्यास सांगितलं.

उत्कर्ष सिंग नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं, ‘दररोज जाणवतं की गंगाजल हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे.’ सूरज त्रिपाठी नावाच्या युजरने लिहिलं – बिहार सरकार अजूनही झोपेत असेल? रुबिना नावाच्या युजरने विचारलं की असे व्हिडिओ पाहून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लाज वाटते का?

अरविंद शुक्ला नावाच्या युजरने लिहिलं, ‘मला वाटलं की गंगाजलसारख्या चित्रपटांत खूप मागच्या काळातील गोष्टी दाखवल्या आहेत..’ आर नावाच्या वापरकर्त्याने कमेंट केली – अतिशय लज्जास्पद आणि आक्षेपार्ह. दिनेश प्रताप नावाच्या युजरने ‘वाह रे गुडशासन, ये तो दुशासन है’ अशी कमेंट केली. वर्षा सिंह नावाच्या युजरने लिहिलं की, हे घृणास्पद कृत्य आहे, बिहार पोलिसांना अजिबात लाज वाटत नाही.

या प्रकरणी एसपींनी इन्स्पेक्टरला निलंबित केलं आहे. दुसरीकडे, इन्स्पेक्टर शशी भूषण सिन्हाने सांगितलं की, हा व्हिडिओ 2 महिन्यांपूर्वीचा आहे. महिलेकडून मसाज करवून घेणं हा गुन्हा नाही, हे खासगी प्रकरण आहे आणि गावातीलच महिला आहे.