मोदींनी INS विक्रांत देशाला सुपूर्द केली:ही देशातील सर्वात मोठी विमानवाहू नौका

0
13

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाला सुपूर्द करणार आहेत. साडेनऊ वाजता मोदी कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये दाखल झाले. येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.पंतप्रधान मोदींनी येथे नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन उपस्थित होते.

मोदींच्या भाषणातील दोन सर्वात मोठ्या गोष्टी…

1. हे सशक्त भारताचे शक्तिशाली चित्र आहे – मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. हे भारताच्या प्रतिभेचे उदाहरण आहे. हे सशक्त भारताचे शक्तिशाली चित्र आहे. हे अमृत महोत्सवाचे अतुलनीय अमृत आहे. हे दाखवून देते की, जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा निश्चय केला तर काहीही अशक्य नाही. आज आपण एका नव्या सूर्याचा उदय पाहत आहोत.

यातून निर्माण होणाऱ्या विजेने 5 हजार घरे उजळून निघू शकतात. ही युद्धनौका दोन फुटबॉल मैदानांएवढी आहे. यातील केबल्स आणि वायर्स कोचीपासून काशीपर्यंत पोहोचू शकतात. ही जटिलता आपल्या अभियंत्यांच्या जीवनशक्तीचे उदाहरण देतात.”

2. नौदलाचा नवीन ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित- मोदी
मोदी म्हणाले- छत्रपती शिवरायांच्या सागरी शक्तीने शत्रू थरथरत होते. आज मी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती वीर शिवाजी महाराजांना समर्पित करतो. हा नवा ध्वज नौदलाचे सामर्थ्य आणि स्वाभिमान अधिक मजबूत करेल. आतापर्यंत नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीचे चित्र होते. आम्ही हा फोटो काढून टाकला आहे.

आयएनएस विक्रांत 20 मिग- 29 लढाऊ विमाने वाहून नेण्यास सक्षम

INS विक्रांत ही देशातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. ही विमानवाहू नौका 20 मिग-29 लढाऊ विमाने वाहून नेण्यास सक्षम आहे. याची किंमत सुमारे 20 हजार कोटी रुपये आहे. 1971च्या युद्धात, आयएनएस विक्रांतने बांगलादेशातील चितगाव, कॉक्स बाजार आणि खुलना येथील शत्रूचे स्थान आपल्या सीहॉक फायटरसह नष्ट केले होते.

25 वर्षांनंतर INS विक्रांतचा पुनर्जन्म
INS विक्रांत 31 जानेवारी 1997 रोजी नौदलातून निवृत्त झाले होते. आता जवळपास 25 वर्षांनंतर INS विक्रांतचा पुन्हा एकदा पुनर्जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 2 सप्टेंबर रोजी विक्रांतला भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. 1971 च्या युद्धात, INS विक्रांतने आपल्या सीहॉक लढाऊ विमानांनी बांगलादेशातील चिटगाव, कॉक्स बाजार आणि खुलना येथे शत्रूंची ठिकाणे नष्ट केली होती.

फक्त 4 देशांकडे आहे 40 हजार टन जहाज बांधण्याची क्षमता
विक्रांत ही 40 हजार टन वजनाची विमानवाहू नौका आहे. जगात, फक्त अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये 40 हजार आणि त्याहून अधिक वजनाची विमानवाहू जहाजे तयार करण्याची क्षमता आहे. विक्रांत 20 मिग-29 लढाऊ विमाने आणि दहा हेलिकॉप्टर वाहून नेण्यास सक्षम आहे. 2017 मध्ये INS विराटच्या निवृत्तीनंतर, भारताकडे फक्त एक विमानवाहू युद्धनौका आहे, INS विक्रमादित्य.