काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचा दावा:भारत जोडो यात्रेनंतर पक्ष नव्या रूपात येईल

0
30

चेन्नई-काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील “भारत जोडो यात्रा’ गुरुवारी कन्याकुमारीच्या पुढे सरकली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यात्रा जीवनरक्षक असल्याचे सांगत म्हटले की, यात्रा पक्षाला नवे रूप देईल.

पक्ष आधीपेक्षा अधिक आक्रमक होईल. यामुळे मित्र व विरोधक पक्षाला किरकोळ ठरवणार नाहीत. पक्षाने राहुलसह ११९ नेत्यांना “भारत यात्री’ नाव दिले. काश्मीरपर्यंतची यात्रा ३५७० किमीची असेल.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. पक्षाने बुधवारी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत भाजपची विचारसरणी इंग्रजांसारखी असल्याचा आरोप केला.

देशावर 3-4 कंपन्यांचे राज्य

आज एका व्यक्तीच्या हातात देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य आहे. हा व्यक्ती हे भविष्य उज्ज्वल करण्याऐवजी विरोधकांना ईडी व सीबीआयची भीती दाखवत आहे. देश पुन्हा गुलामगिरीच्या काळात जात आहे. पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी देशावर राज्य करत होती. आता हे काम 3-4 कंपन्या करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले –

1.भारतात सर्वात मोठे आर्थिक संकट : भारत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटासह आतापर्यंतच्या सर्वात भीषण बेरोजगारीच्या संकटाचा सामना करत आहे. देशाची वाटचाल संकटाकडे होत आहे. भाजप सरकार शेतकरी, मजूर व छोटे व मध्यमवर्यीय व्यावसायिकांना सूनियोजितपणे बरबाद करत आहे, असे राहुल म्हणाले.

2. लोकांचा आवाज दाबला जात आहे : नागरिकांना एकत्र आणणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ते एकजूट होतील याची काळजी काँग्रेस घेील. हेच भारत जोडो यात्रेचे उद्दीष्ट आहे. या यात्रेचा उद्देश भारतातील जनतेला ऐकणे आहे. त्यांचा आवाज दाबला जावा अशी आमची इच्छा नाही.

3. सर्वच संस्थांवर RSS-BJPचा हल्ला : आज सर्वच प्रकारच्या संस्थांवर भाजप व संघाचा हल्ला सुरू आहे. त्यांची भारतात धर्म व भाषेच्या आधारावर फूट पाडण्याची इच्छा आहे. पण हा देश विभाजित करता येत नाही. तो नेहमीच एकजूट राहील.

4. काही उद्योगपती देश नियंत्रित करत आहेत : काही मुठभर मोठे उद्योगपती आज देश नियंत्रित करत आहेत. पंतप्रधान त्यांच्या समर्थनाशिवाय एक दिवसही सर्वाइव्ह करु शकत नाहीत. पंतप्रधान मोठ्या उद्योगपतींसाठी धोरणे आणतात. त्यांची मदत करतात. नोटाबंदी, जीएसटी, कृषी कायदे आदी सर्वकाही त्यांच्या मदतीसाठीच तयार करण्यात आले होते.

5. आज तिरंग्याचा अवमान सुरू : राष्ट्रध्वजाला सलाम करणे पुरेसे नाही. त्यामागील विचारांचा बचाव करणेही महत्त्वपूर्ण आहे. तिरंगा केवळ कापडाचा एका तुकड्यावर 3 रंग व चक्र नाही. तो त्याहून अधिक आहे. तिरंगा सहज मिळाला नाही. तो भारतीयांनी कमावला आहे. तो सर्वच धर्म व भाषांचा आहे. पण आज त्याचा सर्वत्र अवमान सुरू आहे.

सोनियांचा संदेश – यात्रेमुळे होईल संघटनेचा कायाकल्प होईल

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या संदेशात म्हणाल्या की, भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी एक ऐतिहासिक संधी आहे. हा परिवर्तनाचा क्षण आहे. यातून आपल्या संघटनेचा कायाकल्प होईल. मी दररोज विचाराने व मनाने यात्रेत सहभागी असेल. वैद्यकीय कारणांमुळे सध्या मी तिथे उपस्थित नाही.